आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्ली ते दिल्ली उन्हाच्या झळा तीव्र; सोलापुरात उच्चांक, 43.80 ची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/सोलापूर- सोलापूरसह देशभरात उष्णतेचा पारा वाढत आहे. सोलापुरात मंगळवारी दुपारी यंदा हंगामातील ४३.८ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राजधानी नवी दिल्लीत पारा ४४ अंशावर होता. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे पेक्षा जास्त तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. सोलापुरात सायंकाळपर्यंत उष्णतेच्या झळा कायम होत्या. दिवस आणि रात्रही उष्णतेच्या कडाक्याचेच आहेत. 

मराठवाड्यातदाेघांचा उष्माघातामुळे मृत्यू : मराठवाड्यातउष्णतेच्या लाटेने दोन बळी घेतले अाहेत. लोहारा (जि. उस्मानाबाद) येथील मंगेश दत्ता लोहार (२३) या तरुणाचा सोमवारी सायंकाळी उष्माघाताने मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत लक्ष्मीबाई हरिभाऊ गवई (६५, अकोलादेव, ता. जाफराबाद) या त्यांच्या मुलीकडे पारेगाव येथे एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. गावाकडे परत येत असताना उष्माघात झाला. 

उष्णतेच्या झळांनी अंगाची लाही लाही होत आहे. नवी दिल्लीतील एका गरीब वस्तीत राहणाऱ्या चिमुरड्यांनी पाण्याच्या ड्रममध्ये बसून पाणी खेळत खेळत उन्हाच्या झळांना तोंड देत आनंद लुटला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा ऊन आणखी वाढणार, दक्षता घ्या... 
बातम्या आणखी आहेत...