आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्हात केरोसीनमुक्त गावमोहीम; गॅस वापरण्यास देणार प्रोत्साहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाने केरोसीनमुक्त जिल्हा या अभियानांतर्गत केरोसीनमुक्त गाव करण्याच्या सूचना तहसील स्तरावर दिल्या आहेत. ज्या गावांमध्ये केरोसीन वापर कमी प्रमाणात होतो, अशी कुटुंबे शोधून त्यांना गॅस वापरण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे पुरवठा निरीक्षक, मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर दिली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी मंडळनिहाय गावांची नावे कळविली आहेत. 

शासनाने धान्याचा पुरवठा करण्यासाठी शिधापत्रिकेला आधार क्रमांकाची जोडणी बंधनकारक केल्याने ज्यांनी आधार क्रमांक जोडणी केली आहे, त्यालाच धान्य मिळणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय ज्यांना धान्याची गरज नाही त्यांनी धान्य सोडून देण्याविषयी अर्ज भरून देण्याच्या सूचना केल्या आहेत. याच धर्तीवर केरोसीनची मागणी लक्षात घेऊन आता केरोसीनमुक्त गाव मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.  
बातम्या आणखी आहेत...