आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमणीबाबत म्हणणे मांडा, उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विमानतळाच्या शेजारी असलेली चिमणी पाडण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने १२ जनूपर्यंत आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंगे व्ही. एम. कानडे यांनी दिले आहेत. सिद्धेश्वर सहकारी कारखाना व्यवस्थापनाने चिमणी पाडण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती मिळण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने वरील आदेश दिले. 
 
चिमणी पाडकामाच्या आदेशाला स्थगिती देता येणार नाही, स्थगितीसाठी एएआयकडे (एअरपोर्ट अॅथाॅरिटी ऑफ इंडिया) अपील करू शकता, असे न्यायालयाने कारखाना व्यवस्थापनास सांगितले आहे. याबाबतची पुढील सुनावणी १२ जून रोजी होणार आहे. 
सोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच कारखान्याची चिमणी पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उच्च न्यायालयासमोर आम्ही म्हणणे मांडू, असे उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांसोबत होईल बैठक 
कारखान्याच्याचिमणीप्रश्नी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यांनी या विषयात मुंबईत बैठक घेण्यास सांगितल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. विमानतळ हे कारखान्याच्या विरुद्ध दिशेने आहे. तसेच विमानाचे उड्डाणही कारखान्याच्या दिशेने नाही. त्यामुळे विमानाच्या उड्डाणासाठी कारखान्याची चिमणी आड येत नाही. बोरामणी येथे मोठे विमानतळ होत अाहे. येत्या दीड दोन वर्षात आसरा रोड येथील विमानतळ बंद होईल. आमचे हे म्हणणे आम्ही मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत, असे श्री. काडादी यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...