आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची मालमत्ता रस्त्यावर धूळखात पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रस्त्याच्या कडेला लाखो रुपयांचे रोलर आणि जेसीबी ही वाहने धूळखात पडली आहेत. याबाबत महापालिकेने आजपर्यंत त्याची विचारणा केली नाही आणि त्यासंदर्भात कारवाई सुध्दा केली नाही. महापालिकेच्या विद्युत विभागातील अॅल्युमिनियमचा शिडीगाडा बेवारस स्थितीत पडून राहिला आहे. याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यावरून महापालिकेचे अधिकारी कोणाचे हित जोपासत आहेत हे स्पष्ट होते. 
 
जुळे सोलापूर, इंडियन मॉडेल स्कूल समोर गेल्या अनेक वर्षापासून रोड रोलर पडून आहे. तर रुपा भवानी रोड मंत्री चंडकसमोर जेसीबीसुध्दा गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडला आहे. ही दोन्ही वाहने महापालिकेची आहेत की अन्य कोणाचे हे महापालिकेलाच माहीत नाही. महापालिकेच्या मालकीची असतील तर ती गोडावून मध्ये जमा करणे अत्यावश्यक आहे. अन्य कोणाचे असेल तर त्याच्यावर कारवाई करणे अावश्यक आहे. रात्री बेरात्री या उभारलेल्या वाहनांना धडकून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मार्केट यार्ड समोरील महामार्गवर एक वाहन रस्त्याच्या कडेला उभारले होते. वाहतूक करणाऱ्या एका कारने त्या उभारलेल्या ट्रकला ठोकरले. असा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. 

पांजरापोळ चौकातील पेट्रोल पंपाशेजारील बोळात महापालिकेच्या विद्युत विभागातील अॅल्युमिनियमचे तीन शिडी गाडे धूळखात पडले आहेत. हे गाडे गेल्या अनेक वर्षापासून येथे पडून असल्यामुळे याचे चाक मातीत रुतले आहेत. ही बंद अवस्थेतील गाडे गोडावून मध्ये जमा करुन त्याचा लिलाव करून याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक आहे. महापालिकेच्या गोडावून मध्ये असे स्क्रॅप मोठ्या प्रमाणात पडून आहेत. याचा ऑडिट नसल्यामुळे किती साहित्य आले आणि किती शिल्लक राहिले हे सांगणे अवघड आहे. अशी वाहने किंवा साहित्य साठवून ठेवण्याऐवजी ती मोडीत काढून विकणे कधीही चांगले. अन्यथा या ठिकाणाहून किती साहित्य चोरीला गेले हे सांगणे अवघड आहे. 

नोटीस बजावणार 
^रोलर आणि जेसीबी हे कोणाचे आहे तपासून पाहतो. तसेच जे विद्युत विभागाचे अॅल्युमिनियमचे शिडी गाडे आहेत ते गोडावून मध्ये आणायला लावतो. कोण अशा प्रकारे ठेवले आहेत त्यांना नोटीस बजावली जाईल.” लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता 
 
बातम्या आणखी आहेत...