आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्यांना इस्त्री मारत मंगल मावशीने बसवली जीवनाची घडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पतीच्या निधनानंतर खचून जाता मंगल दळवे यांनी इस्त्रीचे दुकान थाटले आणि लोकांच्या कपड्यांना इस्त्री मारता मारता त्यांनी आपल्या घराची घडी बसवली. पाचवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या मंगला दळवे आज वर्धमान नगरसमोरील शाहीर वस्तीत एका गाळ्यात इस्त्रीचा व्यवसाय करतात. त्याच्या तिन्ही मुली त्यांना या कामी मदत करतात. सकाळी ते रात्री वाजेपर्यंत हा कर्मयोग सुरू असतो. घरात कर्ता पुरुष नसतानाही सक्षमपणे घर चालवता येते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. ६० वर्षांच्या मंगल मावशी सांगतात, “शिक्षण कमी असलेल्या महिलांना एक न्यूनगंड असतो. आपण धुणी भांडी केल्यास लोक नावे ठेवतील असे त्यांना वाटत असते. आपण घरी उपाशी बसल्यास कोणी मदतीसाठी येत नाही. त्यामुळे कष्ट करून आपल्या पायावर उभे राहताना संकोच कशाला, असा विचार केला आणि २००२ मध्ये भाऊ घोडके यांच्या मदतीने इस्त्रीचे दुकान थाटले.’ 
 
मी स्वत:च्या पायावर उभी 
^पतीगेल्यानंतर कुणाच्या हाताकडे पाहिले नाही. एक इस्त्री घेतली आणि छकुली नावाने भाड्याचे दुकान घेऊन काम सुरू केले. मुलींनी कामाची इच्छा व्यक्त केली. त्यांनाही सामावून घेतले. त्यांची कुटुंबेही सक्षम झाली. आज मी आनंदात आहे. मंगल दळवे, इस्त्री व्यावसायिक 

पारंपरिक व्यवसायाने तारले 
मंगलमावशी यांचे आई - वडील इस्त्रीचा व्यवसाय करत होते. लहानपणी काम जवळून पाहिले होते. मात्र या कामाला कधीही हात लावला नव्हता. पती दिगंबर हे रेल्वेत वायरमन होते. त्यांच्या अपघाताने कुटुंबावर डोंगर कोसळला. कठीण समयी इस्त्री व्यावसायाने तारले. 

असे करतात काम 
मंगलमावशी यांना जयश्री, विजयालक्ष्मी आणि राधिका या तिन्ही मुली मदत करतात. सकाळी इस्त्रीचे कपडे, भट्टीचे कपडे अशा कामांची विभागणी करतात. मुली, त्यांचे कुटुंब आणि त्यांची मुले असे मोठे एकत्र कुटुंब असल्याने खर्चही मोठा आहे. इस्त्री दुकानावर घर चालते. 
बातम्या आणखी आहेत...