आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, काय आहे नेमके योगशास्त्र? कराल तर तुम्हीही व्हाल चीरतरूण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२१ जूनहा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित झाल्यापासून संपूर्ण जगभरात योगाविषयीची जिज्ञासा वाढली आहे. योग आहे तरी काय, हे मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. योग हा कट्टरतावादी किंवा सांप्रदायिक नाही. तो ईश्वराचे एक विशिष्ट नाव किंवा रूपाबाबत सांगत नाही. तो आदेश किंवा फतवे काढत नाही. योगसाधनेने जीवन ईश्वराशी लीन होते, पावित्र्याने भरून जाते. योग तत्त्वज्ञान विकसित झाले तेव्हा जगात आजच्याप्रमाणे एकांतिक पंथांचा उदय झालेला नव्हता. त्यामुळे योग हा विशिष्ट पंथाच्या (रिलिजन) लोकांना समोर ठेवून विकसित झालेला नाही. योग हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे.

भगवान शिव यांना योगशास्त्राचा उद््गाता आणि प्रवर्तक मानण्यात येेते. आपली अर्धांगिनी देवी पार्वतीला त्यांनी परमतत्त्व, सत्य जाणून घेण्याचा मार्ग सांगितला. हे गूढ ज्ञान म्हणजेच योग. विज्ञान भैरव तंत्रात भगवान शिवाने पार्वतीला सांगितलेल्या ११२ ध्यानसूत्रांचा समावेश आहे. पुराणांमधील उल्लेखानुसार सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात शिव, ॠषभदेव, सनत्कुमार, नारद, कर्दम, कपिल आणि वेद ऋचांचे द्रष्टा अत्रि, वशिष्ठ, कश्यप आदी अनेक योगसिद्ध साधकांनी योग शास्त्राचा विस्तार केला आहे.

योगसूत्रांची रचना- पतंजली
महर्षीपतंजली यांनी योगशास्त्राला क्रमबद्ध करून योगसूत्रांची रचना केली. योगशास्त्राच्या इतिहासात महर्षी पतंजली यांचे कार्य सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. केवळ १९५ सूत्रांत त्यांनी संपूर्ण योगशास्त्राची - अष्टांगयोगाची मांडणी केली आहे. पतंजली ऋषींच्या या योग सूत्रांवरील स्वामी विवेकानंद यांचे भाष्य राजयोग या ग्रंथाच्या रूपात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. आधुनिक काळात भारताबाहेर, युरोप आणि अमेरिकेत योगशास्त्राच्या प्रचाराला स्वामी विवेकानंदांनी राजयोगावरील व्याख्यानांद्वारे सुरुवात केली.

ग्रंथात उल्लेख
भगवद्गीता तेमध्येज्ञानयोग, कर्मयोग, जपयोग आदीचे विस्ताराने वर्णन आहे. योगशास्त्रावरील हे भाष्य शाश्वत रचना आहे. यावर गेल्या पाच हजार वर्षांपासून अनेक योगी आणि विद्वान भाष्य, विवरण करत अनेक ग्रंथांची रचना करत आहेत. आज याच माध्यमातून आपल्यापर्यंत योगशास्त्राचे ज्ञान उपलब्ध होत आहे.
सिद्धाराम पाटील, सोलापूर
पुढील स्लआइड्सवर जाणून घेऊया, योग शास्त्राचे महत्व... काय आहे योग...
बातम्या आणखी आहेत...