आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे महाद्वार घाट झाला मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- जिल्हाधिकाऱ्यांच्याआदेशानंतर रविवारी (दि. १९) पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले. महाद्वार घाटावरील अतिक्रमण पहिल्यांदाच निघाल्याने या मोठ्या रस्त्याचा लोकांनी प्रथमच अनुभव घेतला. ही मोहीम यात्रेपुरतीच राबवता पंढरी कायमची अतिक्रमणमुक्त करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २-३ दिवसांपासून शहरात अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली जात आहे. यात्रेतील पादचारी भाविकांची गैरसोय होऊ नये, रस्त्यावर अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या यात्रा आढावा बैठकीमध्ये अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करावे जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. मात्र प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेऊन प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, महाद्वार घाट परिसर, पश्चिमद्वार, कालिका देवी चौक, काळामारुती आदी भागातील प्रमुख रस्ते अतिक्रमण काढून टाकले. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या व्यापाऱ्यांनी रहदारीचे प्रमुख रस्ते काबीज केले होते.
फक्त यात्रेपुरतेच नको तर कायमस्वरूपी जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ते प्रशस्त आणि खुले ठेवावेत. तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर होऊन शहराचा विकास होऊ शकेल.” प्रवीणमाने, नागरिक
जिल्हाप्रशासनाने भाविकांच्या सोईसाठी आमची अतिक्रमणे काढलेली आहेत. तसाच आमचा विचार करून यात्रेच्या काळात शिवाजी चौक ते महाद्वारपर्यंत फेरीवाल्यांना तसेच बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना प्रवेश दिला जाऊ नये.” विनोदलटके, पेढेवाले व्यापारी
रस्त्यावरअतिक्रमण केलेल्या कोणत्याही व्यापाऱ्यांचे आमचे भांडण नाही. भाविकांच्या सोईसाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत त्यांनी ती काढून प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल.” एस.आर. कुलकर्णी, अभियंता, नगररचना विभाग
बातम्या आणखी आहेत...