आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचाऱ्यांनाे, आठवड्यातून किमान एकदा वापरा खादीचे कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खादी ग्रामोद्योगाचा विकास करण्यासाठी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस खादी कपडे वापरावेत, असा आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. देशातील खादी ग्रामोद्योगात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय पातळीवरूनच उपाय करण्यात येत आहेत. हा त्याचाच एक भाग असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.
खादी आणि ग्रामोद्योग वाढीसाठी केंद्र आणि राज्याने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. अल्प व्याजदरातील कर्जे, करांमध्ये सवलती या बाबी दिल्याने खादी वस्त्रनिर्मितीला चालना मिळाली. तथापि, त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या मुख्य उद्देशाने सामान्य प्रशासन विभागाने एक पाऊल पुढे टाकले. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी खादी वस्त्रे वापरली तर प्रचंड मागणी वाढेल, असे या विभागाला वाटते.
१० टक्क्यांची वाढ
^खादीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनानेच पुढाकार घेतला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खादी वस्त्रे वापरावीत, हा आदेश नुकताच शासनाने काढला. त्याने वस्त्र खरेदीत १० टक्क्यांची वाढ झाली. राहुलजन्नू, खादी कपड्यांचे विक्रेते, सोलापूर

प्रत्येकाचे कर्तव्य
^खादी आणि ग्रामोद्योगाच्या विकासात हातभार लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याने रोजगारनिर्मिती होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट. देशाच्या या कार्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. डॉ.पी. एस. मीना, अपर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन)

खादी साड्या, ड्रेस अन् जॅकेट
बाजारपेठेत खादीचा नवा ट्रेंड आलाय. खादी प्रकारातील नावीन्यपूर्ण साड्या आल्या. पंजाबी ड्रेससाठी खादीला पसंती मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खादीच्या जॅकेटना मागणी वाढली असल्याचे विक्रेते सांगतात. स्वस्त, टिकाऊ आणि आरोग्यास पोषक ही खादी वस्त्रांची वैशिष्ट्ये. त्याला फॅशनची जोड मिळाल्याने या वस्त्रांना सध्या मागणी वाढली.
बातम्या आणखी आहेत...