आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे प्रवाशांना विम्याचे कवच! स्थानकावरील छोट्या घटनांपासूनही सुरक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे प्रवासात अनेकदा प्रवाशांना लुटणे, बॅगा पळविणे, दगडफेक करून जखमी करणे अादी प्रकारच्या घटना घडत असतात. यामुळे प्रवाशांचे आर्थिक शारीरिक नुकसान होते. प्रवाशांना या नुकसानीचा परतावा देण्यासाठी रेल्वे प्रशासन एेच्छिक विमा योजना सुरू करणार आहे.

प्रवासी हा रेल्वेत असो की स्थानकावरील वेटिंग हॉल, आरक्षण केंद्र अथवा बुकिंग आॅफिसजवळ असो एखादी अप्रिय घटना घडून त्यात मृत्यू अथवा गंभीररीत्या जखमी झाल्यास त्याची नुकसान भरपाई रेल्वे प्रशासन देईल. इतकेच नाही तर प्रवाशांची बॅग जरी चोरीला गेली तर रेल्वे त्याचीही नुकसान भरपाई देईल. त्यासाठी प्रवाशाने विमा उतरविणे आवश्यक असणार आहे.
रेल्वे प्रशासन येत्या ऑगस्ट महिन्यापासून प्रवाशांसाठी त्यांच्या सामानांसाठी विम्याची योजना लागू करण्याच्या विचारात आहे. प्रवासी तिकिटाचे आरक्षण करतानाच विमा योजनेची निवड करू शकणार आहे. विम्यासाठी अतिरिक्त २० ते ३० रुपये मोजावे लागणार आहेत. रेल्वे अपघातात विमाधारक प्रवाशाचा मृत्यू झाला तर रेल्वेकडून कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. अपघातात कायम स्वरूपाचे अपंगत्व आल्यास अथवा गंभीर इजा झाल्यास साडेसात लाख रुपयांपर्यंत मदत िमळेल. ही मदत केवळ विमा उतरविल्याने मिळेल. याच्या व्यतिरिक्त सुद्धा रेल्वे प्रवाशांस अथवा त्यांच्या नातलगास रेल्वे नियमाप्रमाणे मदत देईल.
सद्यस्थितीत रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला तर सुमारे लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गंभीर जखमी झाल्यास दोन लाखांपर्यंतची मदत दिली जाते. आता नव्या विमा धोरणाने प्रवाशांना सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे.
रेल्वेमंत्र्यांचा होकार, ऑगस्टपासून लागू?
रेल्वे प्रवाशांना विमा संरक्षण देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू झाले आहेत. ऑगस्टपासून लागू होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्र्यांनी विमा योजनेस संमती दिल्यानंतरच याचे काम सुरू झाले आहे. विमा कंपनीची निवड ही निविदा प्रक्रियेद्वारे होईल. त्यास लवकरच सुरुवात होईल.” अनिलकुमार सक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...