आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न. म. जोशी यांनी ‘सांस्कृतिक परिवर्तन’, पटवर्धन यांचे ‘महाभारत आजही’वर भाष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धर्म,अर्थ, समाज, राजकारण, शिक्षण, विज्ञान, कला, साहित्य हे सांस्कृतिक परिवर्तनाची आठ अंगे आहेत. सध्या या आठही अंगाने जो विकास होत आहे तो संस्कृतीला सोडून होत आहे. या आठही अंगाने संस्कृतीला धरून विकास होणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.
जनता बॅँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्याल बौध्दिक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प डॉ. न.म. जोशी यांनी गुंफले. “२१ व्या शतकात सांस्कृतिक परिवर्तन’ हा त्यांचा विषय होता.
श्री. जोशी म्हणाले, कुठलाही धर्म भांडण शिकवत नाही. मग सर्वजण कुठल्याही भांडणाला धार्मिक भांडण असेच संबोधतात. सर्वांनी मानव धर्माचा विचार करावा आणि हाच विचार विश्व कल्याणाकडे नेईल. कुठल्याही देशाचा विकास हा त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. सध्या सामाजिक परिस्थिती भयानक होत चालली आहे. दुष्कर्म, अत्याचार असे प्रकार आज वाढताना दिसत आहेत. अशा समाजाचा विकास होणार नाही.

हजारोवर्षांपूर्वी घडलेल्या महाभारताचा आजही मोठा प्रभाव आहे. त्या काळात घडलेल्याच अनेक गोष्टी आजही वेगवेगळ्या स्वरुपात घडत आहेत, असे महाभारताचे अभ्यासक राजाराम पटवर्धन (मुंबई) यांनी सांगितले.

उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजिलेल्या बौद्धिक व्याख्यानामालेत श्री. पटवर्धन बोलत होते. ‘महाभारत- आजही’ हा व्याख्यानाचा विषय होता.

श्री. पटवर्धन म्हणाले, “महाभारतामध्ये राजसूय यज्ञ झाला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तो यज्ञ केला. त्यानंतर गुजरात उत्तरेकडील राज्यातील एका प्रदेशाध्यक्षाने महाभारतातील कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण अर्जुन यांच्यातील संवादाच्या छायाचित्रांमध्ये स्वता:चे छायाचित्र घालून त्याचे मोठे फलक लावले होते. महाभारत ग्रंथाचा अन् त्यामधील पात्रांचा उल्लेख देशभरात दररोज कुठेतरी होतोच, यावरून प्रभाव दिसून येतो.”

महाभारतात राजसूय यज्ञ करण्यापूर्वी नारद यांनी धर्मराजास सांगितलेल्या सूचना आजही जशाच्या तशा लागू होतात. राज्यातील जनेतकडे पुरेसे अन्नधान्य आहे का? शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पुरेसे बियाणे आहे का? पावसाळ्यात सर्व तलाव अन्् पाणवठे पूर्ण भरलेत का? शेतकऱ्यांना पुरेसी आर्थिक मदत कर. या गोष्टींची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी स्वरूपातील राक्षसांना दूर करून उद्दिष्टपूर्ती झाल्यास राजसूय यज्ञ केल्याचे पुण्य मिळेल, नारदमुनींनी सांगितले होते. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्याकाळीच महाभारतामध्ये सांगितलेल्या आहेत.

सध्या सर्वत्र उफाळलेला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ त्याकाळाही होतेच, असे सांगून त्यांनी विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्याची कथा अन्् त्यांनी एकत्रित राहून केलेले विश्वदर्शन हे सध्याच्या ‘लिव्ह इन रिलेशन’सारखेच होते, असेही पटवर्धन यांनी सांगितले. जंगलांच्या संवर्धनासाठी वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांच्या संरक्षणाचा महाभारतामध्ये संदर्भ आहे.
महाभारतामध्ये युधिष्ठिर अन् अर्जुन यांच्यात विसंवाद झाला होता. मोठा भाऊ दुखावल्याने अर्जुन प्रायश्चित्तासाठी आत्महत्येचा विचार करतो. त्यावेळी श्रीकृष्णाने त्यास आत्मस्तुती ही आत्महत्याच असल्याने ती करून प्रायश्चित्त करण्याचा सल्ला दिला अन्् अर्जुनाने प्रायश्चित केले.

गायीवरून तेव्हा युद्ध अन् आता गोंधळ
त्याकाळामध्ये गोधन पळवण्यावरून युद्ध होत. सध्याही गायीच्या मुद्यावरून गोंधळ सुरू आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर दिल्लीत झालेल्या गोरक्षकांच्या बैठकीत गायीच्या शेणास पाच रुपये प्रतीकिलो हमीभाव ठरवून देण्याची मागणी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण, सोलापुरातीलच एका ज्येष्ठ कृषीतज्ज्ञाने गायीच्या शेणास प्रतीकिलो १५ रुपये गोमूत्रास २५ रुपये प्रतीलिटर, दूध ६० रुपये प्रतिलीटर भाव मिळणे योग्य असल्याचे सांगितले. गोरसामुळे होणारे फायदे पाहता, तो दर कमी असल्याचे, तज्ज्ञांचे मत होते, असे पटवर्धन यांनी सांगितले.”
देशहित महत्त्वाचे

राजकारणसमाजहिताचे असावे. राजकारण आणि समाजकारण याची सांगड हवी. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत आधार आहे. ध्येयनिष्ठ शिक्षक हवेत आणि समाजाच्या उद्धारासाठीचे शिक्षण हवे. विज्ञान देशहिताचे हवे. कला जपणारे, सामाजिक भान जपणारे कलाकार सध्या राहिले नाहीत. साहित्याचा साहित्य म्हणून भले चालले नाही.
बातम्या आणखी आहेत...