आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवादातून तरुणाईमध्ये स्वप्नांची प्रेरणा रुजवणारा सायन्स शिक्षक हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारताला महासत्ता बनवण्यासाठी संवादातून तरुणाईमध्ये स्वप्नांची प्रेरणा रुजवणारे माजी राष्ट्रपती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने विश्व पोरके झाले. शहरातील विविध क्षेत्रांतील शोकमग्न मंडळींनी वाहिलेली ही शब्दसुमने.
युवकांचे प्रेरक हरपले
डॉ. वासुदेव रायते (पर्यावरणप्रेमी), विद्यार्थी-युवकांना प्रेरणा देणारा ‘मिसाइल मॅन’ हरपला आहे. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करणारा अन्् विकासाची दृष्टी देणारे ते व्यक्तिमत्त्व होते.

तासांतमिळाली प्रेरणा
किशोर ठाकरे (मुख्यउपवनसंरक्षक, ठाणे) : अत्यंत शांत व्यक्तिमत्त्वाचे डॉ. अब्दुल कलाम यांच्यासमवेत सोलापूरमध्ये स्मृती उद्यानातील अवकाश निरीक्षण केंद्राच्या उद््घाटन प्रसंगी राहण्याचे भाग्य मला मिळाले. त्या चार तासांच्या कालावधीत मला खूप मोठी प्रेरणा मिळाली.

नेहमीचऊर्जा मिळाली
रवींद्र सेनगावकर (पोलिसआयुक्त) विद्यार्थीप्रिय अन् अत्यंत शांत संयमी. चेहऱ्यावर नेहमी हास्य. डॉ. अब्दुल कलाम यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी मला पुणे येथील त्यांच्या अनेक कार्यक्रमांमधून मिळाली. त्यांच्या भाषणातून सकारात्मक ऊर्जा मिळे.

शास्त्रज्ञालामुकलो
दत्ता गायकवाड (ज्येष्ठसामाजिक कार्यकर्ते) : शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती अशा उच्च पदांवर काम करून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी उच्च मूल्यांची शिकवण दिली. मुस्लिम असूनही भारतीय संस्कृती, समाज जीवनाशी ते एकरूप होते. ही अभिमानाची गोष्ट. अशा थोर शास्त्रज्ञाला देश मुकला.

व्हिजनरुजवले
प्रा. एम. आर. कांबळे (ज्येष्ठविचारवंत) : एकविसाव्या शतकात सक्षम भारत उभे करण्यात डॉ. कलाम यांचे मोठे योगदान आहे. संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यात मूलभूत संशोधन केले. त्यामुळे भारताकडे बघण्याचा जगाचा रोख बदलला. एक व्हिजन तरुणाईत रुजवण्याचे काम कलामांनी केले.

महासत्तेचेस्वप्न दिले
सिद्धेश्वर बमणी (अध्यक्ष,सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स) : देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक क्षेत्रात साऱ्या जगभरात भारत देशाचे नाव पुढे नेले. आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचे देशवासीयांना दिले.

मिसाइलमॅन’ला मुकलो
डॉ. बी. एच. दामजी (अर्थशास्त्राचेअभ्यासक) : डॉ. कलाम यांनी डीआरडीओ आणि इस्रोमध्ये केलेले कार्य संस्मरणीय आहे. ‘मिसाइल मेन’ आणि थोर शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेले कार्य देश कधीच विसरणार नाही.

टेक्नॉलॉजीचेप्रेरक हरपले
केशव शिंदे (संस्थाप्रमुख, सुयश विद्यालय), अब्दुल कलामांना शाळेत आणून मुलांसमवेत संवाद घडवण्याची खूप इच्छा होती. खूप प्रयत्न केले, पण राष्ट्रपती असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नव्हते. मात्र ते सोलापूरला येणार असे कळाल्यानंतर पुन्हा प्रयत्न सुरू केले. एक वडाचे झाडही लावले. भाषणामधून त्यांनी मुलांना कसे वागावे या बाबत मार्गदर्शन केले. िद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ज्या कामात तुम्हाला आनंद वाटतो, त्याच कामात तुम्ही प्रयत्न करा, असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले होेते.

महानशास्त्रज्ञ हरपला
अॅड. जे. जे. कुलकर्णी (कार्यवाह,मसाप) विज्ञानाचा दृष्टिकोन देणारे ते महान शास्त्रज्ञ होते. ते मिसाईल मॅन म्हणून देशवासीयांच्या कायम स्मरणात राहतील. स्मृती उद्यानातील खगोलशास्त्रीय दुर्बिणीचे उद््घाटन करण्यासाठी ते आले होते, तेव्हा जवळून पाहण्याचा योग आला.
टेक्नॉलॉजीचेप्रेरक हरपले
केशव शिंदे (संस्थाप्रमुख, सुयश विद्यालय), अब्दुल कलामांना शाळेत आणून मुलांसमवेत संवाद घडवण्याची खूप इच्छा होती. खूप प्रयत्न केले, पण राष्ट्रपती असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नव्हते. मात्र ते सोलापूरला येणार असे कळाल्यानंतर पुन्हा प्रयत्न सुरू केले. एक वडाचे झाडही लावले. भाषणामधून त्यांनी मुलांना कसे वागावे या बाबत मार्गदर्शन केले. िद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ज्या कामात तुम्हाला आनंद वाटतो, त्याच कामात तुम्ही प्रयत्न करा, असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले होेते.

महानशास्त्रज्ञ हरपला
अॅड. जे. जे. कुलकर्णी (कार्यवाह,मसाप) विज्ञानाचा दृष्टिकोन देणारे ते महान शास्त्रज्ञ होते. ते मिसाईल मॅन म्हणून देशवासीयांच्या कायम स्मरणात राहतील. स्मृती उद्यानातील खगोलशास्त्रीय दुर्बिणीचे उद््घाटन करण्यासाठी ते आले होते, तेव्हा जवळून पाहण्याचा योग आला.

संग्रहित छायािचत्रे
डॉ. जगदीश पाटील, (वरिष्ठ सनदीअधिकारी) स्मृतिवनातील खगोल निरीक्षण कक्ष उद््घाटनासाठी एपीजे अब्दुल कलाम सोलापुरात आले होते. माझी बदली झाल्याने मी कार्यक्रमास उपस्थित राहणार नव्हतो. परंतु कलाम यांचे सेक्रेटरी प्रसाद यांच्याकडून मला उपस्थित राहण्याबद्दलची सूचना होती. कलामांच्या विमान प्रवासातही मी शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे नाव दौऱ्यात होते. मुंबई विमानतळ ते परतीच्या प्रवासापर्यंतचा सहवास मला लाभला. एवढ्या उंचीच्या माणसामधील निरागसता जवळून पाहण्यास मिळाली. मसुरी येथील प्रशिक्षणानंतरची राष्ट्रपती भवनातील भेट संस्मरणीय आहे.

देशाच्या प्रगतीचा ‘मिसाइल मॅन’ हरपला
डॉ.व्यंकटेश गंभीर (सल्लागार,सोलापूर सायन्स सेंटर) एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशाने ‘सायन्स मॅनेजर’ गमावला आहे. व्हिजन ठेवून काम करणारा हा माणूस भारताला पुढे नेण्यात यशस्वी ठरला. केवळ मिसाइलच नव्हे तर देशातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी सर्व घटकांच्या जीवनाशी संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. कार्बन मटेरिअलचा उपयोग करून कॅलिपर्स तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. स्वप्न पहा, ते खरे करण्यासाठी धडपड करा असे सांगणारे ते महान व्यक्तिमत्त्व होते. सोलापूर सायन्स सेंटरच्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले होेते. त्यांनी लागलीच होकार दिला. मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी विमानसेवा नव्हती, तर कारने येण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. सायन्स सेंटरमध्ये बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले आहे. त्याचे उद््घाटन कलाम यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासमवेत शास्त्रज्ञ अनिल काकोडकर होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी निरीक्षण गृहाबाबत विचारणा केली होती.

स्मृतिवनातील कार्यक्रमात किशोर ठाकरे, डॉ. रायते, तत्कालीन मंत्री ढोबळे, डाॅ. कलाम, डॉ काकोडकर.
सोलापुरातील दौऱ्यावेळी डॉ. जगदीश पाटील, डाॅ. माया पाटील, अॅड. जे. जे. कुलकर्णी, डाॅ. कलाम.
सुयश गुरुकुलमधील कार्यक्रमात विद्यार्थिनीशी हस्तोंदलन करताना डाॅ. ए.पी.जे. कलामसोबत डाॅ. गंभीर, केशव शिंदे आदी.