आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामात रस, राजकारणात नाही - आमदार सुभाष देशमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘मला राजकारणात रस नाही. विकासकामे करण्यास प्राधान्य देतो. महापालिकेत मी एकटा आलो. प्रश्न मांडले, त्यांच्याकडून माहिती मागवली. त्यांची अर्धवट माहिती आली आहे. तेथील प्रशासन काम करत नाही. त्यांच्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी करून काम करून घेणार आहे. काम करताना आरोग्य आणि पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय ज्या कामाला निधी लागणार नाही ती कामे करणे आवश्यक आहे. प्राधान्याने ती करण्याचा मानस आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.

महापालिकेच्या प्रश्नाबाबत आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याशी देशमुख यांनी मंगळवारी चर्चा केली. कामांची यादी िदली. त्यानंतर त्यांना आयुक्त कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली. त्याबाबत देशमुख म्हणाले, ‘मनपा अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभा करू. शासकाकडे प्रलंबित प्रश्नाचा पाठपुरावा करून निधी आणू.’

अवंती नगर येथे रेल्वे पूल
अवंती नगर ते सोरेगावपर्यंत रस्ता करण्यात येणार आहे. अवंती नगर येथे रेल्वे भुयारी मार्ग करण्याचा आराखडा तयार करण्यास निधी देण्यात आला आहे.

देशमुखांनी दिलेला विकास निधी
दक्षिण सोलापूर : एक कोटी
उत्तर सोलापूर : १० लाख
शहर : ९० लाख

नगरसेवकांना बोलवत नाही
महापालिकेच्याकामाबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यास एकटा येतो आणि जातो. भाजप नगरसेवकांना बोलवले नाही असे आमदार देशमुख म्हणाले. यावेळी अविनाश महागांवकर, शशी थोरात, विशाला गायकवाड, डाॅ. शिवराज सरतापे आदी उपस्थित होते.