आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of World Literature Chairman Sheshrao More

सावरकरांचा अभ्यास करणे गुन्हा आहे?, वाचा विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मोरे यांची मुलाखत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंदमान येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे सांगत होते. शुक्रवारी त्यांनी ‘½’ कार्यालयाला भेट दिली. अंदमानचे संमेलन, साहित्यातील पुरोगामी आणि प्रतिगामी यासंबंधी त्यांनी मुक्त संवाद साधला.
"हिंदू, मुसलमान म्हणून पाहणे हे पाप आहे, हे सावरकरांचे विचार जातीयवादी आहेत का? त्यांचा अभ्यास केला म्हणून मी प्रतिगामी असल्याचा शिक्का मारण्यात आला. काय सावरकरांचा अभ्यास करणे गुन्हा आहे? मी सेक्युलरच... माझे विचार समजून घ्या..."
- प्रश्न : दाभोलकर, पानसरे हत्या किंवा काश्मीरच्या मुद्द्यावर जातीय आणि धार्मिक चर्चा वाढलेली दिसते. तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडताहेत. एकूण वातावरणावर काय वाटते?
मोरे : दाभोलकर तर सावरकरांचेच काम करत होते. पानसरे कुठल्याही धर्माच्या विरोधात बोललेले नाहीत. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातून त्यांनी शिवरायांचा खरा इतिहासच मांडला. पण बुद्धिवादी परंपरेची हत्या सुरूच राहिली. ती काही नवीन नाही. चार्वाकपासून आहे. यातून एखाद्या चळवळीकडून दुसरी चळवळ मोडणे असे कधीच झालेले नाही. विचारांची हत्या होते. परंतु माणसांची होत नाही. त्याने लोकांमध्ये चीड निर्माण होते. दाभोलकर गेले. त्याचे वाईटच वाटले. पण निर्माण होणाऱ्या अतिरेकी गटाचे चित्र भयानक आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे आणखी काय म्हणाले...
शब्दांकन : श्रीनिवास दासरी