आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सध्या गतिमान केली जात आहे. ही मोहीम चालू असतानाच अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांचा जप्त करण्यात आलेला माल पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तिस- यांच व्यक्तींकडून लंपास केला जात होता. त्यावेळी पोलिस आणि पालिका प्रशासनास या बाबत माहिती दिल्यानंतर माल लंपास करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे एकीकडे आक्रमकतेने अतिक्रमण हटवले जात होते तर दुसरीकडे आपापाचा माल गपापाला या म्हणीप्रमाणे तिसऱ्याच व्यक्तींकडून लंपास होत असल्याचे दिसत होते. त्यामुळे पालिकेची ही कसली अतिक्रमण मोहीम अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत होती.

मध्यंतरी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिका-यांनी पालिका प्रशासनाला शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित काढण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याच वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अतिक्रमणे काढताना व्यापा-यांना त्रास होणार नाही किंवा त्यांच्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रशासनाला सांगितले होते. महाद्वार, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, चौफाळा या भागातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली.
जे व्यापारी सांगूनही अतिक्रमण काढण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यांचा माल जप्त करून तो पालिकेच्या गाडीमध्ये घातला जात होता. या वेळी पालिकेच्या टेम्पोमध्ये पालिकेचे कर्मचारी आलेले होते. या मध्येच एक त्रयस्त व्यक्ती पालिका कर्मचा-यांना हाताशी धरून जप्त केलेल्या मालावर डल्ला मारत होता. या वेळी काही सतर्क नागरिकांनी ही गोष्ट पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन आपला पोलिसी खाक्या दाखवला. मोहिमेत ओळखपत्रे गळ्यात अडकवण्याची पोलिसांची सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाळलेली दिसत नव्हती. त्यामुळे कर्मचारी आणि त्रयस्त ओळखू येत नव्हते.
पंढरपूर. येथे अतिक्रमण मोहिमेवेळी रस्त्यांवरच्या फेरीवाल्यांचा माल जप्त केला जात होता. अतिक्रमण मोहिमेच्या वेळी पोलिस, नगरपालिकेचे अधिकारी आणि व्यापा-यांत सतत तू तू मै मै होत होते. फेरीवाल्याचा गाडा नगरपालिकेच्या गाडीत ठेवताना कर्मचारी. छायाचित्रे: राजू बाबर,
मोहिमेच्या वेळी जे आडमुठी भूमिका घेत होते त्यांना मोहिमेला विरोध करू नका असे सांगत होतो. जप्त मालाची चोरी करणा- यां अनोळखी व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतले आहे.” गोपाळचावडीकर, पीआय

दुकानांच्या पानसरी काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्यांनी दुर्लक्ष केले तिथे अतिक्रमण हटावची आम्हाला कारवाई करावी लागली.” एस.आर. कुलकर्णी, अभियंता, मोहीम प्रमुख
अतिक्रमण मोहिमेच्या वेळी जप्त केलेला माल व्यापा- यांना परत मिळाला पाहिजे. आज चक्क तो चोरला जात असल्याचे नागरिकांनी त्वरित निदर्शनास आणून दिले.” रघुनाथसकटे, व्यापारी

मालाची नासधूस तर भाविकांची चंगळ
पालिकेच्यावतीने आज राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या वेळी खेळणी, बांगड्या, देवदेवतांच्या मूर्ती, फोटोफ्रेम तसेच प्रासादिक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसत होते. अधिक महिना असल्यामुळे अतिक्रमण मोहिमेकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले होते. मात्र पालिकेने अतिक्रमण मोहीम तीव्र केल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा माल आज जप्त करण्यात आला. या वेळी बऱ्याच दुकानदारांच्या मालांची नासधूस होताना दिसत होती. या वेळी रस्त्यावर सांडलेले चिरमु-यांचे पुडे, पेढ्यांचे पुडे उचलण्यासाठी भाविकांची चक्क धडपड चालू असल्याचे दिसत होते.