आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायऱ्यांवरही चालणारे अनोखे व्हीलचेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आजारी,अपंगांना घेऊन पायऱ्यांवरूनही नेता येऊ शकणारे व्हीलचेअर सोलापुरातील निरामय फिजिअाेथेरपी रिहॅब सेंटरमध्ये विकसित करण्यात अाले. केपीअायटी स्पाकॅल २०१६ या राष्ट्रीय इनोव्हेशन स्पर्धेत या व्हीलचेअरला ११ वा क्रमांक मिळाला अाहे. यात देशभरातून १० हजार विद्यार्थ्यांनी १७०० कल्पना नाेंदवल्या होत्या. यातील ५४ निवडण्यात आल्या.

अशी साकारली संकल्पना
सांगलीच्या इस्लामपूर (साखराळेगाव) येथील अारअायटी काॅलेजचे विद्याथीॅ अभिषेक पंडित, प्रोजक्ट प्रमुख डाॅ. एस. डी. यादव, डाॅ. सुषमा कुलकणीॅ सोलापूरच्या निरामय फिजिअोथेरपी रिहॅब सेंटरचे डाॅ. संदीप भागवत यांच्यात चार वर्षांपासून सामंजस्य करार अाहे. त्यातून हे उपकरण तयार झाले. पेटंटसाठी प्रस्ताव देण्यात आला असून उपकरण लवकरच बाजारात उपलब्ध हाेणार आहे.

व्हीलचेअरची वैशिष्ट्ये
- इमारतीचा जीना, ग्रामीण भागात माती खडकाळ भागातूनही नेता येईल.
- खाली बसवलेले लाकडी दाते (पाय) सुरू करताच व्हीलचेअरची चाके उचलली जातात.
- रुग्ण, अपंगांच्या छाती, पोट, हातांना बेल्टची सोय. मोबिलिटी बेस जोडला की जीना चढ-उतार जमतो.