आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर तलाव परिसरात नशा करणाऱ्यांचा अड्डा,परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि भोवतालचा तलाव यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते. परंतु, तलाव परिसराला अलीकडच्या काळात अनेक समस्यांनी ग्रासले आहे. दिवसरात्र होणारा मद्यपी गर्दुल्यांचा त्रास, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे होणारे परिसराचे विद्रुपीकरण, तलावात होणारा सांडपाण्याचा प्रादुर्भाव अशा एक ना अनेक समस्यांमुळे मंदिर आणि तलाव परिसराच्या सौंदर्याला ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक सिद्धेश्वर भक्त नाराजी व्यक्त करत आहेत. यासाठी एक स्वतंत्र लढा निर्माण करावा लागेल, अशा सूचना समोर येत आहेत.

लक्ष्मी भाजी मंडईजवळ प्रवेशद्वारलगत तलावात सातत्याने सांडपाणी येत आहे. याशिवाय पंचमुखी हनुमान मंदिर ते गणपती घाट भागातील तलावाच्या बाजूने रहिवाशांकडून सांडपाणी सोडले जात आहे. सिद्धरामांचे मानसबंधू असणाऱ्या श्री अण्णबोमय्या मंदिर गटारीने वेढल्याचे दिसत आहे. मंदिरलगत तीन ते चार सांडपाण्याचे पाइप आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
लक्ष्मी मंडईकडून प्रवेश केल्यावर डाव्या हाताला झाडांच्या सावलीत कट्ट्यांवर बसून स्थानिक रहिवासी नशा करत असतात. ते नित्याचेच झाले आहे. दारूपिणे, गांजा ओढणे अन्य नशा येथे रासरोस होते. याकडे मंदिर समिती, पोलिस प्रशासन महानगरपालिकेने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पोलिसांचे गस्तीपथक तलावाभोवती फरण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही असे सुरक्षारक्षक संजय घाडगे यांनी सांगितले.

सुरक्षा रक्षकांना होते मारहाण
^सुरक्षारक्षकांनीनशा करणाऱ्या तरुणांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण होते. त्यामुळे येथे केवळ लाठीकाठीवाले सुरक्षा रक्षकांचा उपयोगे नाही. सैन्यात काम केलेले गनमॅन आवश्यक आहेत. वचक बसण्यासाठी पोलिसांनी गस्ती घालताना अशांना हुसकावणे गरजेचे आहे.'' अनिल म्हमाणे, सिक्युरिटीइंचार्ज

पालिकेने केले होते काम
तलावात लक्ष्मीमंडईच्या भागातून सांडपाणी येत असल्याने पालिकेच्या विभागीय कार्यालयाला कळवले होते. त्यानुसार ते आले रस्त्यावर असणारे चेंबर साफ केले. सध्या सांडपाणी कमी प्रमाणात येत आहे. त्याचा बंदोबस्त करावा. या भागात काही नशा करणारे लोक दुपारी रात्री येऊन दारू पिणे, गांजा ओढत असतात. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहात ग्रामदैवत मंदिराचे पावित्र्य जपून सहकार्य करणे गरजेचे आहे.'' मल्लिकार्जुनप्पा वाकळे, विश्वस्तपंचकमिटी

या उपायांनी होईल नियंत्रण
- तलाव परिसरात वॉच टॉवर उभे करावेत.
- वाॅच टाॅवर लांबपल्ल्याचे फिरते प्रकाशझाेत ठेवावेत
- पूर्णवेळ शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत
- लक्ष्मी भाजी मंडईच्या बाजूने भाविकांची संख्या वाढेल असे पाहावे.

चेंबर साफ केले गळती थांबवली आहे
मंदीर समितीकडून प्राप्त सूचनेनुसार सफाई कामगारांना घेऊन चेंबर साफ केले आहेत. याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी सांडपाण्याचा प्रवाह थांबवल्यावर तेथे लगेच काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. तेव्हाच हा प्रश्न मार्गी लागेल.'' मोहन माशाळे, पालिकाअधिकारी
सिद्धेश्वर तलाव परिसरात लक्ष्मी मंडई बाजूच्या प्रवेशद्वारजवळ आत बसून मद्यपी गर्दुले निवांतपणे नशा करत असतात.
बातम्या आणखी आहेत...