आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बील देताना स्वच्छतागृह तपासले का नाही, पथकाची विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्याचेस्वच्छता विभागाचे उपसचिव आनंद परदेशी, प्रीतमकुमार जावळेंसह पाच जणांचे पथक सोमवारी महापालिकेत आले. त्यांनी दोन बैठका घेतल्या.
स्वच्छतागृहाचे अनुदान दिले पण ते देताना मुख्य लेखापाल कार्यालयाकडून तपासले का? असा प्रश्न जावळे यांनी विचारला. याबाबत मंगळवारी पुन्हा बैठक घेणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.

केंद्र सरकारच्या घर तेथे स्वच्छतागृह योजनेत राज्यातील एकूण हिश्श्यापैकी ३० टक्के हिस्सा सोलापूर शहरासाठी दिला. सुमारे १४ हजार ६६२ स्वच्छतागृहे बांधण्यासाठी मंजुरी दिली. त्यासाठी निधी दिला. त्या रकमेचा खर्च कसा झाला, स्वच्छतागृह कोठे बांधले याची माहिती शासनास महापालिकेकडून दिली जात नाही.

योजनेसाठी राज्यात सर्वाधिक निधी सोलापूर शहरासाठी दिला. त्यानुसार महापालिकेने मक्तेदार नेमून स्वच्छतागृह बांधले. त्या रकमेचा हिशेब शासनास दिला नाही. त्यामुळे शासनाने उपसचिव आनंद परदेशी, प्रीतमकुमार जावळे, श्रीनाथ देंडे, महेंद्र संके, प्रमोद कानडे या पाच जणांचे पथक सोलापुरात पाठवले. मागील दोन महिन्यापूर्वी हे पथक सोलापुरात आले होते. पण त्यांच्या मागणीनुसार माहिती दिली नाही. त्यामुळे पथक परतले. पुन्हा हे पथक सोमवारी शहरात दाखल झाले आहे. उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, मुख्य लेखापाल सुकेश गोडगे यांच्यासह मनपाचे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सायंकाळी पुन्हा बैठक घेतली. वित्तीय नियमानुसार बिल देताना योग्य व्यक्तींना िबल दिले जाते का? याची तपासणी केली का? आदी प्रश्न जावळे यांनी विचारले. त्यांच्याकडील प्रश्नामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी पुन्हा माहिती संकलन करत आहे. याबाबत मंगळवारी मुख्य लेखापाल गोडगे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

यादी मंगळवारी
महापालिकेने आमच्या मागणीनुसार यादी तयार केली आहे. त्यात किरकोळ दुरुस्ती आहेत, त्या सांगितल्या. सोमवारी ते यादी तयार करतील आणि मंगळवारी आमच्याकडे देतील. त्यानंतर आम्ही शहरातील स्वच्छतागृह ठोकताळपणे मोजू, निधी खर्च झाला का ते पाहू.” आनंद परदेशी, उपसचिव,स्वच्छता विभाग

आजबैठक
शासनाचे पथक आले. त्यांच्यासोबत बैठक झाली. त्यांच्या मागणीनुसार यादी तयार आहे. निधी खर्चाबाबत त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यासाठी मंगळवारी मुख्य लेखापाल यांच्यासोबत बैठक होणार आहे.” श्रीकांत म्याकलवार, उपायुक्त,महापालिका