आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर २०१४ ची पुनरावृत्ती, घरात शिरले नाल्याचे घाण पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- बुधवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने नाले तुडुंब भरून वाहले, तर शनी मंदिर परिसरातील नाला जाळी बंद असल्यामुळे घाण पाणी नागरिकांच्या घरात घुसले. अखेर सन २०१४ ची पुनरावृत्ती घडलीच. नगर परिषदेने मान्सूनपूर्व नियोजन करून नाल्याची साफसफाई केल्याने संबंधित नाल्याचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले.

अनेक मागण्यांनंतर राम जोशी यांच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित शनी मंदिराजवळील नाल्याची साफसफाई करण्यास सुरुवात केली. मात्र, रेल्वेने जाळी लावून नाला बंद केल्याने तो प्रश्न कायम राहिला आहे. परिणामी, बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान नागरिकांच्या घरात नाल्याचे घाण पाणी केरकचऱ्यासह घुसले. अनेकांचे अन्नधान्यासह साहित्य खराब झाले. यामध्ये काही व्यापारी वर्गाच्या गोडाउनमधील माल ओला झाला.

रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान सर्वत्र घाण पाणी पसरल्याने अनेक परिवार उघड्यावर आले. सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्याच रात्री मुख्याधिकारी यांना फोन करण्यात आला. मात्र, साहेबांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर संतप्त काही नागरिक मुख्याधिकारी यांच्या क्वॉर्टरवर जाऊन धडकले. अनेक आवाज देऊनही ते बाहेर आले नाहीत. दरम्यान, रात्री १२ वाजता आमदार हरीश पिंपळे यांनी भेट देऊन पाहणी केली. राम जोशींनी जिल्हाधिकाऱ्यांना रात्री १२ वाजता फोन करून आपबिती कथन केली. मात्र, काहीही फरक पडला नाही. रात्रभर पाऊस सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्रभर नाल्याच्या भीतीने जागते रहोची भूमिका घ्यावी लागली.

‘दिव्य मराठी’ने केले होते सावध
संबंधित नाल्याचा प्रश्न समोर आणून नाल्याचे पाणी साफसफाईअभावी घरात शिरणार असल्याचे वृत्त प्रकाशित करून सावध केले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचेही नमूद केले होते. मात्र, तरीही मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मूलभूत सोयी पुरवण्यास असमर्थ
शहरात नगर परिषदेचे अस्तित्व आहे की नाही, अशी गत झाली आहे. पाणीपुरवठा, साफसफाई यासह मूलभूत सुविधा पुरवण्यास नगर परिषद असमर्थ ठरली आहे. शहरात दूषित पाण्याचा पुरवठा यावरून नगर परिषदेचा हलगर्जीपणा दिसून येतो.

रात्री १२ वाजता केली साफसफाई
नाल्याची परिस्थिती पाहता श्याम जोशी, गजानन माने, भास्कर अडतकर यांनी शासकीय यंत्रणेची वाट पाहता रात्री १२ वाजता भरनाल्यात उतरून अडकलेला केरकचरा साफ केला. यात जीवाची पर्वा करता समाजहिताला महत्त्व देत साफसफाई करण्याची भूमिका घेतल्याने नाला मोकळा झाला.
बातम्या आणखी आहेत...