आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISSUE ABOUT CHANDRABHAGA GHAT IN PANDHARPUT, Divya Marathi

चंद्रभागा घाटाचे काम अपूर्ण ; ठेकेदारास रोज २५ हजार दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- चंद्रभागा नदीवरील घाटाच्या सुशोभिकरणासाठी जुना दगडीपूल ते विष्णूपदपर्यंत घाटाचे बांधकाम सुरू केले होते. तीन कोटी ५० रूपये खर्च करुन व पाच वर्षे उलटूनही हे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, सन २०१४ पासून ठेकेदाराने काम बंद केले हाेते. त्यानंतर मुदतवाढ देऊनही काम सुरू झाले नाही. त्यामुळे ठेकेदाराला दरराेज १० हजार रूपये दंड करण्यात आला. परंतु त्यानंतरही व नंतरही दोनवेळा ठेकेदाराला मुदतवाढ देऊनही घाटाचे काम सुरू केले नाही. त्यामुळे काम पूर्ण हाेईपर्यंत ठेकेदाराला दरराेज २५ हजार रुपये दंड केल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.के. शिंदे यांनी दिली.

सध्या त्या ठेकेदाराचा कामाचा ठेका काढून घेण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून दिला आहे. तो मंजूर होऊन आल्यावर पुन्हा निविदा काढून काम देण्यात येईल. यासाठी पाच महिने लागतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

सन २०१० मध्ये या कामास सुरूवात झाली होती. तेव्हा १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत राज्य सरकारने इंद्रायणी, गोदावरी नदीवरील घाटाचे सुशोभिकरण केले. परंतु चंद्रभागा नदीवरील घाटाकडे दुर्लक्ष केले. शिवाय येथे येणाऱ्या भाविकांची संख्या व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे चंद्रभागा स्नान हे लक्षात घेता प्रशासनाने चंद्रभागा घाट बांधकाम व सुशोभिकरणाकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. चंद्रभागेचे स्नान हे महत्त्वाचे असल्याने लाखो भाविक त्यासाठी येतात. नदीवरील घाटाची दुरवस्था झाली आहे. हे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा वारकरी फडकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगावकर यांनी
व्यक्त केली.