आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅल्बीप्रकरणी बुद्धदर्शन मंडाळावर गुन्हा दाखल, १० गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डाॅ.अांबेडकर मिरवणुकीत रविवारी डाॅल्बीचा अावाज प्रमाणापेक्षा जास्त ठेवल्याप्रकरणी बुद्धदर्शन सामाजिक संस्था, तरुण मंडळ बुधवार पेठ, अध्यक्ष अर्जुन जाधव यांच्यासह रवी गायकवाड, सोनकांबळे, गणेश चंदनशिवे, सुनील गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. सहायक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली अाहे. रविवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला अाहे.

डाॅल्बीचा अावाज मोठा ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी सूचना देल्यानंतरही त्याचे पालन केले नाही. उलट अरेरावीची भाषा वापरली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात अाली. एकूण दहा मंडळावर गुन्हे दाखल झाले असून अद्याप कुणाला अटक नाही.