आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजच्या कामाने आतापर्यंत बळी,२४ तासांनंतरही पोलिस रेकाॅर्डवर ठेकेदाराचे नाव निष्पन्न नाहीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विजापूररस्त्यावरील सिंधू विहार काॅलनीत राहणारा पीयूष प्रसाद वळसंगकर (वय १३ ) या मुलाचा रविवारी सायंकाळी ड्रेनेजसाठी बांधण्यात अालेल्या चेंबरमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी ठेकेदाराचे नाव पोलिसांनी शोधून काढले नाही.
मैदानात वीस फुटांहून अधिक खोल खड्डा मारण्यात अाला अाहे. त्याठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा संरक्षक अशा काहीच उपायोजना केल्या नाहीत. पीयूष मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात बुडाला. या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न अाता समोर अाला अाहे. सोलापुरात अातापर्यंत तीन-चार वर्षांची अाकडेवारी पाहता सुमारे सात-अाठ जण खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू पावलेत. महापालिका, पोलिस प्रशासन तत्कालिक अाश्वासन देतात अथवा उपाययोजना करतात. घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा जैसे थे स्थिती असते. इथे माणसाचा जीव जातोय याचे कुणालाच सोयरसुतक नाही असे या घटनांववरून दिसून येते. घटनेनंतरही मनपाने कोणतीच दखल घेतलीच नाही.

दास आॅफ शोअर कंपनी ठेकेदार : दास आॅफ शोअर ही कंपनी ड्रेनेज लाइनचे सिंधू विहार येथे काम करीत आहे. चेंबरसाठी खड्डा खोदला आहे. कामाच्या देखरेखीची जबाबदारी महापालिकेच्या वतीने उपअभियंता रवी ढावरे यांच्याकडे होती.

महापौरांची भेट, आज घेणार आढावा
सिंधूविहारजवळ ड्रेनेज खड्ड्यात मुलांचा बळी गेल्याने सोमवारी महापौर सुशीला आबुटे, विरोधीपक्ष नेता नरेंद्र काळेंसह महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. कामे जलदगतीने करणे, कामाचे मक्तेदार कोण आहेत याबाबत आढावा घेण्यासाठी महापौर सुशीला आबुटे यांनी मंगळवारी दुपारी ११.३० वाजता बैठक बोलवली अाहे.

^ड्रेनेज कामाचेकंत्राट महापालिकेकडून खासगी मक्तेदाराला देण्यात अाले अाहे. पीयूषच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून ठेकेदारावर रविवारी सकाळी गुन्हा दाखल झाला अाहे. ठेकेदाराचे नाव काय अाहे हे कळविण्यासाठी मनपाला पत्र दिले अाहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल. - नरसिंग अंकुशकर, पोलिस निरीक्षक, विजापूर नाका
पीयूषचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वळसंगकर परिवाराचा अाक्रोश सुरूच अाहे. माझा दादा गेलो हो म्हणून बहीण राजनंदिनी (वय १०) तर अाजोबा नातू गेला म्हणून धायमोकलून रडत होते. अाई तर बोलण्याच्या मनस्थितीत नाही. माझा सोन्यासारख मुलगा गेला. दहा मिनिटांत अालो म्हणून घराबाहेर पडलेला पीयूष पुन्हा घरी अालाच नाही. ड्रेनेज काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. अाज माझा मुलगा गेला उद्या अाणखी कुणावर तरी हा प्रसंग येऊ नये म्हणून उपाययोजना करणार की नाही, असा प्रश्न प्रसाद वळसंगकर यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केला. पीयूषवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात अाले. मुलाची सँडल, सायकल दाखवून रडत होते. घरापासून घटनास्थळ तीनशे-चारशे मीटर अंतरावर अाहे. अाज पुन्हा जाऊन घटनास्थळ त्यांनी दाखवले. चेंबरजवळ गेल्यावर प्रसाद इथेच माझा पीयूष गेला म्हणून रडू लागले. दरम्यान, वसुंधरा स्कूलमध्ये पीयूष सातवीत शिकत होता. त्याला श्रद्धाजंली अर्पण करून दुपारी अडीचनंतर सुटी दिल्याचे सांगण्यात अाले.

सिंधू विहारमध्ये रविवारी एका मुलाचा खड्ड्यात पडून मूत्यू झाला.त्या ठिकाणी अजूनही लहान मुले जात आहेत. खड्ड्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत.

सोलापूर महाराष्ट्रसुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत शहरात १६० कि. मी. ड्रेनेज लाइन घालण्यात येत आहे. या कामाअंतर्गत विजापूर रोडवर दोघे, होटगी रोडवर एक तर सिंधू विहार काॅलनीजवळ एकजण असे चार जण मृत्यू पावले असताना, कामात हयगय केली जात आहे, तरीही महापालिका बघ्याची भूमिका घेताना दिसून येते. मुलगा मृत्यू पावल्याने त्यांचा अहवाल तयार करण्याचे काम मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडून सुरू आहे. तत्काळ खड्डा बुजवणे आवश्यक : ड्रेनेजलाईनसाठी खड्डा खोदल्यावर काम करून तत्काळ खड्डा बुजवणे आवश्यक असताना तसे केले नाही. महिन्यापासून खड्डा तसाच आहे. तेथे पाणी साचले आणि गाळ तयार झाला. घटनेनंतरही महापालिका संबंधित ठेकेदारांनी कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. सोमवारीही खड्डयाशेजारी कोणतीच सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आलेली दिसून आलेली नाही.

तीनवेळा मुदतवाढ तरीही काम अपूर्ण : नगरोत्थानअंतर्गत २१२ कोटींचे काम एसएमसी कंपनीस देण्यात आले. वेळेत काम केले नाही म्हणून त्यांचा मक्ता तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रद्द करून दास कंपनीस दिले. महापालिकेने वेळेवर बिले दिले नाही म्हणून कंपनीस मुदतवाढ देण्यात आली. त्यांची मुदत ३१आॅक्टोबरपर्यंत आहे. ८०टक्के काम पूर्ण : नगरोत्थानयोजना अंतर्गत १६० किमी ड्रेनेज लाइन घालण्यात येत असून, त्यापैकी १३९ किमी चे काम पुर्ण झाले तर २१ किमीचे काम राहिले आहे. १२ हजार प्राॅपर्टी चेंबर पैकी २८५० चंेबर बांधण्यात आले.

त्या घटनास्थळीजाऊन पाहणी केली. त्या बालकांच्या मृत्यू प्रकरणी अहवाल मागवला आहे. दास आॅफ शोअर कंपनीकडे मक्ता आहे. मुंकूदभालेराव, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोण कोणत्या खड्यात झाले अपघात...
बातम्या आणखी आहेत...