आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकरांच्या जमीन गैरव्यवहाराची चौकशी, आमदार डोळस यांनी दिली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - माळशिरसचे माजी उपसभापती तथा चांदापुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जानकर यांनी दिघंची (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील देवस्थानच्या जमीन खरेदीत गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली असल्याची माहिती आमदार हनुमंत डोळस दिघंची येथील अॅड. विलास देशमुख यांनी दिली.

अकलूज येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तम जानकर इतरांनी दिघंची येथे बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी करून त्याचे बिगरशेती प्लॉट््स पडल्याचे पुरावे आमदार डोळस अॅड. देशमुख यांनी पत्रकारांना दाखवले. दिघंची येथील श्रीनाथ देवस्थानची गट क्रमांक १६०७ १६११ मधील सुमारे ३० एकर जमीन उत्तम जानकर इतरांनी बेकायदेशीररीत्या खरेदी केली. या जमिनीचे बिगरशेती प्लॉट्स पाडून विक्रीही सुरू केली आहे. ही जमीन खरेदी करताना जानकर इतरांनी गैरप्रकार केल्याची तक्रार येथील नागरिकांनी डोळस यांच्याकडे पुराव्यासह केली होती. डोळस यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. या प्रश्नाला जयंत पाटील, दीपक चव्हाण, भारत भालके, शशिकांत शिंदे, अनिल बाबर, सुरेश लाड या आमदारांनी पाठिंबा दिला. देवस्थानच्या जमिनी हडप करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर शासन कोणती कारवाई करणार असे, डोळस यांनी सभागृहात विचारले.

दिघंची येथील श्रीनाथ देवस्थानच्या जमीन खरेदी-विक्रीत गैरप्रकार अनियमितता झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात मान्य केले आहे. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांना चौकशीचे आदेश देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे सह धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी ११ एप्रिल २०१६ रोजी एक आदेश काढून तो आदेश ज्या ठिकाणी हे प्लॉट्स पाडून श्रीनाथनगर वसवले आहे.

काय आहे प्रकरण
दिघंचीयेथील श्रीनाथ देवस्थानची सुमारे ३० एकर जमीन प्लॉट्स पाडून विकली जात आहे. या बेकायदेशीर प्रकरणाची तक्रार येथील ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे २०१४ पासून वारंवार केली आहे. देवस्थानची जमीन विकण्यासाठी सह धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय अशा जमिनी विकता येत नाहीत. सध्या या जमिनीतील निम्म्यापेक्षा जास्त प्लॉट्स विकले गेले आहेत.

आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे
सांगलीतील सहसत्र न्यायालयात आम्ही याविरोधात अर्ज केला होता. या अर्जावरून न्यायालयाने सह धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांना या प्रकरणाची सर्व कागदपत्रे चौकशीसाठी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन लढाई सुरू आहे.” उत्तम जानकर, अध्यक्ष,चांदापुरी साखर कारखाना
बातम्या आणखी आहेत...