आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या श्वानांचा धुडगूस, निर्बिजीकरणाचे हवे नियोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- हिंस्र,मानवी जीविताला धोकादायक असणाऱ्या, दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या श्वानांना मारण्यास हरकत नाही, असे हायकोर्टाचे निर्देश असताना महापालिका प्रशासन मात्र त्यांचा बंदोबस्त करण्याकडे ठोस पावले उचलत नाही. सोमवारी सकाळी अासरा रस्ता, मंत्री चंडक इस्टेट येथे पिसाळलेल्या श्वानांनी ११ जणांवर हल्ला करून चावा घेतला. मात्र, मनपाने कसलीच दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासन कोणाच्या मरणाची वाट पाहात आहे काय, असा संतप्त सवाल येथील नागरिकांतून होत आहे.

सोमवारी सकाळी मंत्री चंडक इस्टेट येथून जात असताना शबाना सलीम नदाफ (वय ३० , रा. नई जिंदगी) यांच्यावर पिसाळलेल्या श्वानांनी हल्ला चढवला. त्या जोरात ओरडल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या सुरेश पोंदे यांनी दगड मारून कुत्र्यांना हाकलले. मात्र श्वानांनी त्यांच्या छाती, हातावर चावा घेतलाच.

या घटनेनंतर काहीच वेळेत पायी येत असलेल्या सरदारअली जहागीरदार (वय ५८) यांच्या पायाचा चावा घेतला. तसेच बाबूराव कल्याणशेट्टी (वय ४०, रा. लोकमान्य नगर) यांच्या मानेला चावा घेतला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्या श्वानाचा पाठलाग केला. यावेळी श्वानाने अंगणात खेळत असलेली मुन्नज्जा शेख (वय ७, रा. मंत्री चंडक स्टेट) हिच्यावर हल्ला करत पाठीवर, हातावर चावा घेतला. तेवढ्यात नागरिकांनी तिला श्वानाच्या तावडीतून सोडवले आणि त्या श्वानाला मारले. जखमींना सिव्हिलमध्ये नेऊन औषधोपचार करण्यात येत आहेत.
डॉ. जयंती आडके आरोग्यअधिकारी

प्रशासन गप्प का
मंत्रीचंडकस्टेट परिसरातील श्वान पिसाळलेले आहेत. थेट माणसांवर हल्ला करतात. तरीही प्रशासन शांत आहे. जीव गेल्यानंतर मनपा जागे होणार का? सुरेश पोंदे, ज्येष्ठनागर
निर्बिजीकरण सुरू

- आजतागायत३२००श्वानांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया झाली आहे. श्वानांना पकडण्यास गेल्यावर कर्मचाऱ्यांबरोबर नागरिक वाद घालत आहेत. श्वानांना पकडू देत नाहीत. नागरिकांनी सहकार्य करावे. डॉ. शैलेंद्र तिवारी,केंद्र प्रमुख

काही दिवसांपूर्वी रेबीजने तरुणांचा गेला बळी
रामवाडी परिसरातील आसिफ नावाच्या युवकाला रेबीजमुळे जीव गमवावा लागला होता. यापूर्वी पूर्व भागात राहणाऱ्या निहारिका कोंकारी हिच्यावर श्वानांनी हल्ला केला होता. यामध्ये तिचा पूर्ण चेहरा खराब झाला होता. चेहरा खराब झाल्यानेे प्लास्टिक सर्जरीकरता आमदार प्रणिती शिंदे यांनी मदत केली.

पावसामुळे श्वानांची जखम वाढण्याची शक्यता :
पिसाळलेले श्वान एकमेकांवर हल्ले करतात. हल्ला केल्यानंतर जखम होते त्यावर पावसाचे पाणी पडले की जखम मोठी होते आणि त्यातून अळ्या बाहेर येतात. नंतर दुर्गंधी येते.

प्रश्न- पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त केला आहे का? उत्तर-तीन डॉक्टर आणि एनजीओ यांची कमिटी कार्यरत आहे. श्वान पिसाळलेले असल्याचे समजताच पथक तेथे जाऊन त्या श्वानाला पकडते. प्रश्न-अशीे उदाहरणे कुठे कुठे झालीत ? उत्तर-गेल्या सहा महिन्यांत चार ते पाच ठिकाणी असे प्रकार आढळलते. मात्र निश्चित स्थान सांगता येणार नाही.
प्रश्न-डॉक्टर, एनजीओचे नावे काय ? उत्तर-आता नाव लक्षात नाही, नंतर सांगते.
बातम्या आणखी आहेत...