आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराधार अनुदान योजनेसाठी ज्येष्ठ घालताहेत येरझऱ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजयगांधी निराधार योजनेत असलेल्या अनेक लाभार्थींना गेले अनेक महिने वेतनबाबत बँक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सतत येणे-जाणे करावे लागत आहेत. त्यामुळे थकलेल्या जिवाला सणातील गोडधोड तर सोडा चटणी-भाकरीकरता हेलपाटे घालावे लागत आहेत. ज्यांचे कोणी नाही अशांना महिन्याच्या वेतन लाभाची योजना केलेले सरकार आणि अाताच्या शासनाकडून वेळेवर वेतन मिळत नाही. याबाबत गरजू आणि गरीब नागरिकांत संताप आहे. शासन आणि जिल्हा स्तरावर होणाऱ्या कामाच्या दिरंगाईमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोणचदाद देत नाही
शहर-जिल्ह्यातएक लाख ५६ हजार ६५९ लाभार्थी असून शहरात १६ हजार ७१९ लाभार्थी आहेत. सध्या अनेक लाभार्थींना योजना विभागातून महिन्याचे अनुदान वेळेवर वाटप करण्यात येत नाही. ते तीन ते चार महिन्याने येते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी संजय गांधी योजनेतील चेक पद्धत बंद करून आरटीजीएस पद्धत सुरू केल्याने खरंतर कामकाज जलद केले. मात्र, आरटीजीएस प्रक्रियेतून लाभार्थींना रकमेचे वाटप लवकर होणे गरजेचे असताना तसे होत नाही. अनेकदा बँकांत पैसे जमा होतात पण ते पुन्हा विभागाच्या खात्यात जमा होतात. कारण, गरीब लाभार्थ्यांकडे त्याला आवश्यक असणारे आयएफसी कोड खाते नाही. त्याचा अनेक लाभार्थ्यांना फटका बसत आहे. त्यातील काही महिलांनी तोंडी तक्रार केली. मात्र, त्यांना बँकेकडून वारंवार संबंधित ऑफिसला भेट द्या असे उत्तर देण्यात येते. या महिलांना आॅफिसला जाण्या-येण्याकरता ५० रुपये खर्च होत असून मिळणारे अनुदान ६०० आहे. त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न लाभार्थींसमोर असतो.

लाभार्थीस दरमहा रुपये २००, ४०० ते ६०० असे योजनेप्रमाणे अनुदान देण्यात येते.
एका कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी असेल तर कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.

तांत्रिक अडचण दूर करू
काही लाभार्थींना अनुदान मिळण्यात अडचण येत असेल तर त्या तांत्रिक अडचणींचे िनराकरण करून त्यांना वेतन देऊ. तांत्रिक अडचणीत लक्ष देऊ.” अरुणागायकवाड, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना

मूळ हेतू बाजूलाच...
केंद्र,राज्य शासनाने १९८० मध्ये संजय गांधी निराधार योजना सरू केली. निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने योजना सुरू केली होती. महिन्याला अनुदान देण्यात येऊन लाभार्थीला अार्थिक आधार मिळावा हा योजनेचा मूळ हेतू असून ६०० रुपये अनुदान नेहमी खंडित रूपाने मिळते. त्यामुळे लाभार्थीला कायम अुनदानाची वाट पाहावी लागते. यातून शासनाचा वंचितांना मदत करण्याचा हेतू बाजूलाच आहे. यामुळे या िनराधारांना उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटित महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी
परित्यक्त्या किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.

वय- ६५ वर्षांपेक्षा कमी
कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत
एकूण लाभार्थी : िजल्हा : लाख ५६ हजार शहर : ६५९ हजार ७१९
योजनेचे नाव जिल्हा (लाभार्थी)शहर(लाभार्थी)
संजय गांधी निराधार योजना ४४४९१ ८३८१
श्रावण बाळ योजना ५६७०६ ५६६२
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना ३२७८८ २६७३
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना १८० ०१
इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग विधवा १४९४ ०२

शासनाने दिली तर देतो
शासनाकडूनआलेली रक्कम त्या पद्धतीने देतो. पूर्वी अनुदान चेकने होत, आता आरटीजीएस पद्धतीने होते. गेले अनेक महिने झाले काही लाभार्थींचे अनुदान आलेले नाही. ते आले की त्वरित देऊ.” नंदकुमारअाराध्ये, व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, सुभाष चौक शाखा

कितीवाट पाहायची?
आम्हीपैशाची खूप आतुरतेने वाट पाहतो. जे येते त्यात भर घालून आम्ही जीवन जगतो. शासनाकडून मदत झाली नाही तर कसे करणार? मिळणारी रक्कम वेळेत येत नाही. हेलपाटे घातल्यानंतर मिळणारी रक्कम घेऊन आनंद होत नाही.” मंगलहावळे, लाभार्थी

जगायचंकसं?
मीखूप थकले आहे. अंगात त्राण नाही. सारखे बँकेत जाणे परवडत नाही. सण असेल की नेमका आमचा शिमगा असतो. लोक आनंद साजरा करतात. आम्ही परिस्थितीने लाचार असतो. आम्हाला रक्कम वेळेवर दिली तर बरे होईल.” द्रौपदीजाधव, लाभार्थी

सांभाळण्यासकोणही नाही
सांभाळण्यासकोण नाही यासाठी खटपट करून नाव नोंदवले. पण महिन्याला अनुदान मिळत नाही. त्याकरता खूप वेळा जावे लागते. तेव्हा इकडे जा तिकडे जा असा निरोप देण्यात येतो. त्याने उपेक्षाच होते.” शांताबाईसाकत, लाभार्थी
बातम्या आणखी आहेत...