आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाने घेतलेल्या सहाव्या "पेट’ला स्थगिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठाने नुकतीच घेतलेली पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) ०६ परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. २६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली होती. यातील पात्र उमेदवारांची १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मुलाखतीही झाल्या आहेत. मात्र एवढ्या प्रक्रियेनंतर यूजीसीने दिलेल्या सूचनेनुसार सध्या ही संपूर्ण प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती बीसीयूडी संचालक प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सूचनाही देण्यात आल्या आहेत. नव्या नियमावलीनुसार हे बदल झाले आहेत.
आता सर्व प्रक्रिया स्थगित असेल
वाणिज्य,शिक्षणशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान या शाखेतील विविध जागांसाठी संशोधक विद्यार्थ्यांना गाइड अलॉट करण्यात आले होते. अभियांत्रिकी, विधी, कला ललित कला, पदार्थविज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदी विषयांतील विविध जागांवर गाईड अॅलॉट करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता ही सर्व प्रक्रियाच स्थगित असेल.

बदललेला नियम काय ?
विद्यापीठअनुदान आयोगाने जुलै रोजी सर्व विद्यापीठांना निर्देश दिले की संबंधित विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त पदव्युत्तर महाविद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्त असणाऱ्या मार्गदर्शकांनाच संशोधक विद्यार्थी देण्यात यावेत.

बदलाचाअर्थ काय ?
यानिर्देशाचा अर्थ असा की, आता इतर विद्यापीठातील कोणत्याही शिक्षकांना गाइडशीप देता येणार नाही. त्यांना संशोधक विद्यार्थी देता येणार नाही. त्याशिवाय ज्या संलग्नित महाविद्यालयात पदव्युत्तर केंद्र नाही तेथील प्राध्यापकांनाही मार्गदर्शक म्हणून कार्य करता येणार नाही.

परिणामकाय ?
सोलापूरविद्यापीठाने पेट ०६ परीक्षा घेतली होती. सुमारे एक हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातून विविध विषयातील सुमारे १२० जागांसाठी मुलाखतीची यादीही गुणवत्तेनुसार आरक्षणानुसार प्रसिद्ध झाली होती. या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीही झाल्या. गाइड अलॉट करण्यात आले. दरम्यान आलेल्या निर्देशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया स्थगित झाली आहे.

यूजीसीच्या निर्देशानुसार पेट प्रक्रियेला स्थगिती
संशोधनकरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत बाहेरील विद्यापीठाचे मान्यताप्राप्त गाइडला विद्यापीठ मान्यता देत होते. यूजीसीने दिलेल्या निर्देशानुसार आता पेट ०६ ची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करावी लागली. यूजीसीकडून मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत सर्व प्रक्रिया स्थगित असेल. यूजीसीकडून मार्गदर्शकतत्त्वे जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.
विद्यार्थीसंशोधनकार्यावर परिणाम होईल
यूजीसीनेनवीन नियम लागू केले आहेत.त्याचा फटका संशोधन कार्याला होण्याची शक्यता आहे.ज्या महाविद्यालयात पदव्युत्तर केंद्र असेल त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांना गाइडशीप देण्याचा निर्देश दिल्यास गुणवत्ताधारक गाइड पर्यायाने त्यांना अलॉट होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. साहजिक संशोधन कार्यावरच परिणाम होईल. डॉ.अनिल बारबोले, प्रोफेसर

मान्यताप्राप्त गाइड
कलाललित कला- ६३
वाणिज्य- १४
पदार्थविज्ञान - ४९
फार्मसी इंजिनिअरिंग- ४४
सायन्स- ६६
सामाजिक शास्त्र- १०५
विधी- ०३
एकूण - ३४४
बातम्या आणखी आहेत...