आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरीकरणात सोलापूर लटकले मध्येच, काम पूर्णपणे रखडलेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गुलबर्गा-वाडीदरम्यानचे दुहेरीकरण पूर्ण झाले अाहे. मुंबईकडे जाण्यासाठी भिगवण ते दौंड मोहोळ ते सोलापूर हे काम पूर्ण झाले अाहे. पण मधेच मोहोळ ते भिगवणदरम्यान काम रखडले अाहे. दोन्हीकडून कामे होत आहेत. सोलापूरला गती कधी मिळणार असा प्रश्न अनुत्तरितच राहिला अाहे.

रेल्वे विकास महामंडळतर्फे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान न्यू तिलाटी ते अक्कलकोट स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. रेल्वे मार्गाच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले भराव टाकण्याचे काम पूर्ण होऊन स्लीपर रुळ टाकले गेले. रुळांना जोडण्यासाठी सध्या वेल्डिंगचे काम सुरू आहे. तसेच अक्कलकोट रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करून एक अतिरिक्त फलाटदेखील बांधून तयार आहे. स्थानकावर सध्या यार्ड बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे वाकाव ते वडशिंगेदरम्यान काम धिम्या गतीने सुरू आहे. जोपर्यंत मोहोळ ते िभगवणदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत पुणे, मुंबई दिशेचा सोलापूरकरांचा प्रवास जलद गतीने होणार नाही.

दुहेरीकरण होत नाही तोपर्यंत विद्युतीकरणही होणार नाही. वास्तविक पाहता आतापर्यंत विभागातील दुहेरीकरणाचे काम संपणे आवश्यक होते. मात्र रेल्वे प्रशासनाचेच या कामाकडे दुर्लक्ष आहे. होत असल्याने आरव्हीएनएला जाब विचार तर कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. मोहोळ ते भिगवण दरम्यानच्या कामास विलंब होत असला तरीही दुसरीकडे न्यू तिलाटी ते अक्कलकोट मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. सोबतच अक्कलकोट रेल्वेस्थानकावर अप् साइडने लूप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. लूप लाइनचा फायदा असा की गाड्यांना क्रॉसिंगला थांबावे लागणार आहे. गाड्यांची वाहतूक जलद गतीने होईल. या सोबतच अक्कलकोट स्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या अक्क्लकोट स्थानकावर एक लूप लाइन एक मेन लाइन आहे. आता एक अतिरिक्त लूप लाइन दुहेरीकरणाच्या निमित्ताने अक्कलकोट स्थानकावर येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य संरक्षक आयुक्तांकडून मार्गाची पाहणी केली जाईल. त्यांच्याकडून कामास प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या मार्गावरून रेल्वे धावण्यास सुरुवात होईल. यासाठी आणखी एक ते दोन महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मोहोळ ते भिगवन दरम्यानचे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांपैकी मोहोळ ते वाकावदरम्यान २३ किमीचे दुहेरीकरण झाले आहे. मात्र वाकाव-माढा -वडशिंगे दरम्यानचे काम धिम्या गतीने सुरू आहे. येथे केवळ रुळांच्या मजबुतीसाठी भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले. स्लीपर अन्य तांत्रिक बाबी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.

वाकाव प्रगतिपथावर
न्यूतिलाटीते अक्क्लकोट दरम्यान दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले. येत्या एक ते दोन महिन्यात अक्कलकोटपर्यंत मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल. वाकाव ते वडशिंगे दरम्यानचे काम प्रगतिपथावर आहे.” अनुपअग्रवाल, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, आरव्हीएनएल, मुंबई
बातम्या आणखी आहेत...