आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांच्या अंगावर टिपर घालण्याचा प्रयत्न, सोलापूर जिल्ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळशिरस- वाळू वाहतुकीचा टिपर तहसीलदार बाई माने यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी सायंकाळी माळशिरस येथे म्हसवड रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलसांत नोंद झाली नव्हती. यापूर्वी माढा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या तर करमाळ्यात तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला होता.

तहसीलदार माने कार्यालयातून निवासस्थानाकडे निघाल्या होत्या. यावेळी त्यांना वाळू वाहतूक करणारी टिपर (एम एच ४५ ८३५) दिसली. त्यांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. ती गाडी थांबवली. त्यानंतर चालक राजू बिले (रा. बोेंडले) याला गाडी पोलिस ठाण्याला घेण्यास सांगितले. त्यानंतर तहसीलदारांच्या जीपचे चालक आनंद गायकवाड हे त्या टिपरमध्ये बसताना चालक राजू याने त्यांना ढकलून दिले. तसेच टिपर वळवून तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी रस्त्याकडेला खड्ड्यात गेल्याने त्या बचावल्या. घटनेनंतर टिपरचालकाने पलायन केले. यावेळी कोतवाल वजीर इनामदार, तलाठी पी. के. उन्हाळे उपस्थित होते. दरम्यान, तहसीलदार माने यांनी वाळू वाहतुकीच्या सात वाहनांवर कारवाई केली आहे.
बातम्या आणखी आहेत...