आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू ट्रकचालकाला भोवणार हल्ला, जिल्हाधिकारी हल्ला प्रकरणाचा आज काळ्या फितीने निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हाधिकारी यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचा वाहन परवाना आणि वाहनाची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार अाहे. पुढील तपासासाठी उरळी कांचन आणि दौंड येथे दोन पथके रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक हनुमंतराव पलांडे यांनी दिली. दरम्यान, महसूल कर्मचारी-अधिकारी संघटनेकडून काळ्या फिती लावून शनिवारी घटनेचा निषेध नोंदवला जाणार अाहे.
चालक सचिन मिसाळ हा कौठाळी येथील ठेक्यावरून वाळू भरून पुणेकडे निघाला होता, जिल्हाधिकारी यांनी वाहन पकडले असता त्याच्याकडे दोन ब्रासची पावती होती, प्रत्यक्षात मात्र त्याच्या ट्रकमध्ये ब्रासपेक्षा अधिक वाळू आढळली. महसूलकडून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक परांडे यांनी केली.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
लऊळ (ता. माढा) येथील घटनेबद्दल ट्रकचालकास दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. शनिवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. ट्रकचालकाकडून अधिक माहिती घेतली असता तो मूळचा शिरसाव (ता. परंडा) येथील असून त्याने दौंड येथे ट्रक खरेदी केला आहे. तो उरळी कांचन येथे वाळू वाहतूक करतो. त्याठिकाणी अधिक माहितीसाठी पथक रवाना झाले आहे.