आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल ऑनलाइन घोषित, पण नाही मिळाल्या गुणपत्रिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभाग सध्या चर्चेत आहे तो चांगल्या तत्पर कार्यासाठी. ऑनलाइन पद्धतीने वेळेच्या आत निकालही घोषित होत आहेत. परंतु महाविद्यालयांशी सुसंवाद नसल्याने निकाल लागून महिना उलटला तरी त्याच्या छापील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना विचारले तर विद्यापीठाकडून गुणपत्रिका मिळाल्या नसल्याचे कारण सांगितले जाते. विद्यार्थी जर गुणपत्रिका मागणीसाठी विद्यापीठात आला तर त्याला महाविद्यालयाकडूनच गुणपत्रिका मिळतात, येथे येण्याचे कारणच नाही, असे सांगितले जात आहे.

आतापर्यंत घोषित निकालापैकी सर्व विषयांच्या, सर्व शाखेच्या गुणपत्रिका छापून तयार आहेत. पण महाविद्यालयेच ती घेऊन जात नसल्याचे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात महाविद्यालयांनी मात्र विद्यापीठाकडून गुणपत्रिका अद्याप मिळाली नसल्याचे कारण पुढे केले आहे. परीक्षा विभाग ऑफिस वेळेनंतरही कार्यरत राहून कामाचा निपटारा करीत आहे. कर्मचारी संख्या कमी असूनही वेळेपूर्वी निकालाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवण्याची म्हणूनच अपेक्षा आहे.

^निकाल वेळेत घोषित होत आहेत, मात्र हे निकाल फक्त ऑनलाइन दिसत आहेत. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हातात गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. यातून विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी येतात. परीक्षा विभागाने गुणपत्रिका वेळेत दिल्या तर समस्या सुटतील.'' प्रा.डॉ. एस.एन. सलवदे, विद्यापीठमागासवर्गीय प्राध्यापक संघटना

^काही महाविद्यालये लेजर गुणपत्रिका घेऊन गेली आहेत. मात्र काहींनी गुणपत्रिका नेलेल्या नाहीत. संपर्क साधून घोषित झालेल्या निकालांच्या गुणपत्रिका घेऊन जाव्यात. यात अडचण आली तर परीक्षा विभागाशी संपर्क साधावा.'' बी.पी.पाटील, परीक्षानियंत्रक, विद्यापीठ

गुणपत्रिका नसल्या तरी लेजरद्वारे हाेतात प्रवेश
महाविद्यालयांनीविद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यासाठी गुणपत्रिका नसेल तर लेजरवरील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहे. गुणपत्रिका तयार असतील तर मग लेजरवरून प्रवेश प्रक्रिया करण्याची गरजच काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

काही अभियांत्रिकीच्याविद्यार्थ्यांना तर गेल्या दोन तीन टर्मपासूनच्या गुणपत्रिका अद्याप मिळालेल्या नाहीत. पॅटर्न बदलाचा प्रश्न समजून घेता येईल पण रेग्युलर विद्यार्थ्यंानाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठ आणि महाविद्ययालयांनी सुसंवाद ठेवून मार्ग काढता येईल.'' प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, बीजेपीटेक्नोक्रेट सेल
बातम्या आणखी आहेत...