आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर-जिल्ह्यातील २० धर्मादाय रुग्णालयांची होणार तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो... - Divya Marathi
फाइल फोटो...
फाइल फोटो...
सोलापूर- गरीब दुर्बल घटकांसाठी राखीव खाटा ठेवणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती करावी. तपासणीत दोषी आढळतील, त्या रुग्णालय व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले. जिल्ह्यात २० धर्मादाय रुग्णालयांची नोंदणी असून त्यापैकी सध्या बंद आहेत.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत सवलतीच्या दराने खाटा राखीव ठेवण्याबाबत समितीची बैठक आयोजिण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने लाभ घेणाऱ्या सर्व रुग्णालयांची तपासणी करून अहवाल सादर करण्यात यावा, तसेच विक्री कर विभागाने विक्रीकर संबंधित त्या रुग्णालयाने रजिस्ट्रेशन केले आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. शिवाय जिल्ह्यातील उर्वरित धर्मादाय रुग्णालयांची तपशीलवार माहिती घेऊन गरीब गरजू रुग्णांना शासन निर्णयानुसार मोफत सेवा देण्यासंबंधी सूचना केल्या आहेत. तपासणी पथकामध्ये धर्मादाय आयुक्त, शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी महापालिका कार्यालय यांचे प्रतिनिधी असणार आहे. या पथकाने रुग्णालयाची तपासणी करून महिनाभरात अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण, सहायक धर्मादाय आयुक्त आर. आर. कोरे, विधी अधिकारी वर्धमान वसगडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, तहसीलदार उज्ज्वला सोरटे, डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते.

गरजू रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा
शहरजिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये शासन निर्णयानुसार उपचार केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय धर्मादाय आयुक्त यांच्या वतीने एक संयुक्त सॉफ्टवेअर तयार केले जाणार आहे. यामध्ये ज्या रुग्णालयाकडून रुग्णांना उपचार दिले जात नाही, त्यासंबंधी संबंधित रुग्ण त्याच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यास तत्काळ कारवाई करता येणार आहे. यासाठी एक स्वतंत्र क्रमांकही नागरिकांनी उपलब्ध करता येईल का? यासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली.

अश्विनी ग्रामीण रुग्णालयास नोटीस
कुंभारीयेथील पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी ग्रामीण रुग्णालयास धर्मादाय आयुक्तांनी राखीव खाटा ठेवल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गरीब गरजूंसाठी एकूण खाटाच्या १० टक्के खाटा त्यांनी राखीव ठेवल्या नाहीत. नोटीसमध्ये १५ दिवसांत खुलासा सादर द्यावा, अन्यथा पुढील कारवाई करणार असल्याचे नमूद केले आहे. यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख बिपीनभाई पटेल यांनी नोटीस मिळाली आहे. या नाेटिशीला आम्ही कायदेशीर उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.