आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्रोत कोरडे, पाण्यासाठी धडपड, भूम तालुक्यातील ६६ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा- तालुक्यात भयाण दुष्काळाची छाया पसरली असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिवंत पाण्याचे स्त्रोत दम तोडत आहेत. ६० गावांत १२७ विहिरी बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २८ ठिकाणी ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे.

परंडा तालुक्यात सर्वाधिक प्रकल्पांची संख्या आहे. मात्र, २०१२ पासून सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने सिंचनक्षेत्रात कमालीची घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये उसाचे क्षेत्र हजार ३०० हेक्टर होते, पैकी हजार हेक्टर ऊस पाण्यामुळे वाळून गेला आहे. रब्बीच्या सरासरी ३६ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रातील बहुतांशी पिके वाया गेली, तर खरिपाचे २३०० हजार सरासरी क्षेत्रापैकी २० हजार क्षेत्रातील पीक करपून गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येला कवटाळू लागला आहे. शासनाने २०१४-१५ मधील खरिपासाठी २६ कोटी रुपये अनुदान मंजूर केले. परंतु, महसूल कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या घोळात अनेक गावांचे अनुदान लटकले असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. रब्बी हंगामातील पीकविमा १७ लाख रुपये भरण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना भरलेली रक्कमही मिळाली नाही. कोटी विमा मिळणे अपेक्षित होते, परंतु ४४ लाख रुपये मंजूर झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

यंदातालुक्यात ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा : तालुक्यात९६ गावांपैकी ८८ गावांत भयानक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २०१२-१३ मध्ये ३४ गावांत ४५ अधिग्रहण टँकर सुरू होते. २०१३- १४ मध्ये ४५ गावांत ५४ अधिग्रहण टँकर सुरू होते. २०१४-१५ मध्ये ५६ गावांत ८८ अधिग्रहण १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. २०१५-१६ मध्ये ६० गावांत १२७ अधिग्रहण २८ ठिकाणी ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

अधिग्रहीत स्रोत दोन दिवसांत तोडतो दम
सीना-कोळेगाव या प्रकल्पात मागील तीन वर्षांपासून पाणीसाठा झाला नाही, त्यामुळे प्रकल्प कोरडा ठणठणीत पडला आहे. खासापुरी, साकत, चांदणी खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. यामुळे परिसरातील गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सोनारी, मुगाव, शेळगाव येथील साठवण तलाव कोरडे आहेत. तसेच लघु प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच बोअर दम तोडू लागले आहेत.

फक्त धुराळाच
तालुक्यातीलभूजल पातळीने तळ गाठला आहे. ९०० फुटांपर्यंत बोअर घेऊनही फक्त धुरळाच निघत आहे.
- वयाच्या ६५ वर्षांपर्यंत कधीच दावणीची जनावरे छावणीवर नेण्याची वेळ आली नव्हती. परंतु सततच्या चार वर्षांच्या दुष्काळामुळे सगळे जुने संदर्भच बदलून गेले आहेत. -चंद्रभानवनवे, ज्येष्ठशेतकरी.

- स्रोतनसलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टंचाई निवारणासाठी उपाय करण्यात येत आहेत. - स्वरूप कंकाळ, तहसीलदार,परंडा.

टँकर लॉबी सक्रीय
शहरातपरिसरात १५ खासगी टँकरचालकांचा गोरख धंदा सुरू आहे. हजार लिटरचे टँकर ८०० ते १००० रुपयांस विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.

कळंब तालुक्यातील गावांमध्ये दिवसभर टँकरची वाट पाहिल्यानंतर पाणी येताच ग्रामस्थांची गर्दी तुटून पडते.

चार वर्षांमध्येइतकी पाणीटंचाई कधीच भासली नाही. परंतु अवर्षणामुळे लगतचा मांजरा प्रकल्प कोरडा पडल्यामुळे तासनतास टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. - इंद्रजित टेळे, नागरिक, दाभा.

दुष्काळामुळे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेली शेती पूर्णपणे मोडकळीस आली आहे. कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. - बाळासाहेब गोरे, नागरिक,कोथळा.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशी आहे पाण्याची भिषण परिस्थिती....