आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे १५ हजार विडी कामगारांसाठी धान्य, मुख्यमंत्र्यांनी केली होती वाटपाची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विडीकारखानदारांनी बंद पुकारल्याने विडी कामगारांना धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मात्र याची अंमलबजावणी करण्यासंबंधी कोणतीही सूचना नसल्याने जिल्हा प्रशासन पेचात अडकले होते. यावर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जे विडी कामगार आहेत, पण धान्य मिळत नाही, अशा कामगारांची यादी केली. यामध्ये शहरात १५ हजार ७५० कामगार आढळून आले. ही यादी सोमवारी सायंकाळी राज्य शासनाला सादर करण्यात आली आहे. यादीला मंजुरी मिळताच धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिली.

शहरातील विडी कारखानदारांकडून २३ २४ एप्रिल रोजी आगाऊ रकमांचे वाटप करण्यात आले. या वेळी अन्नधान्य वितरण कार्यालयाने केशरी कार्ड असलेल्या धान्य मिळत नसलेल्या कामगारांचे रेशन कार्ड ओळखपत्राच्या प्रती जमा करून घेण्यात आल्या. यामध्ये छाननी केल्यानंतर १५ हजार ७५० कामगार आढळून आले, यासाठी १८९ टन गहू तर १२६ टन तांदूळ लागणार आहे.

उत्पादन विक्री करणाऱ्या दुकानांच्या तपासणीचे आदेश
शहरातील विडी कारखाने बंद असल्या कारणाने महिला विडी कामगार मोरछाप रंग पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत. यादृष्टीने या रंगाचे उत्पादन िवक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुंढे यांनी अन्न औषध प्रशासनाला दिले आहेत. शिवाय मोरछाप रंग अरोग्यास अपायकारक असून, हा रंगाचे पिऊ नये, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाने केेले आहे.

कामगारांना बंद काळातील वेतन
कारखानदारांनी प्रती कामगार वेतन म्हणून हजार रुपयांचे वाटप केले. पुढील टप्प्यात ८०० रुपये देण्यात येणार असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त बी. आर. देशमुख यांनी दिली. बंद काळात एकूण पगाराच्या ६० टक्के रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. ही रक्कम दिल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. प्रथमच कारखानदारांनी बंद काळातील आगाऊ रक्कम कामगारांस दिली.