आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभार: औषध-गोळ्यांत डॉक्टरांची मनमानी; रुग्णांना भुर्दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद-जिल्हारुग्णालयात औषधगोळ्या उपलब्ध असताना काही डॉक्टर बाहेरून घेण्यास सांगत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांंच्या खिशाला झळ बसत आहे. बहुतांश रुग्णांच्या केसपेपरवर डॉक्टरांनी दिलेल्या औषधगोळ्या पैकी काही गोळ्या बाहेरून घेण्यास सांगितल्याचे दिसून आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मनमानीमुळे रुग्णांना बाहेरून औषधगोळ्या घ्याव्या लागत अाहेत, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत अाहे

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत. त्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहे. कधी हलका पाऊस तर कधी सोसाट्याचा वारा, कधी ढगाळ वातावरण आणि मध्येच उन्हाचा कडाका निर्माण होत आहे. या वातावरणामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला यासह इतर साथीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वातावरण बिघडत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक कमी खर्चात उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टर तपासणी करून काही औषधी रुग्णालयातील तर काही औषधी बाहेरून घेण्यास सांगतात. प्रत्यक्षात रुग्णालयातील औषधालयात जवळपास सर्वच औषधी वेगवेगळ्या नावाने उपलब्ध असतात. याबाबत सर्व डॉक्टरांना प्रत्येक आठवड्याला माहिती दिली जाते. परंतु, बहुतांश डॉक्टर जाणीवपूर्वक बाहेरची औषधे देत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी नाव सांगण्याच्या अटीवर केला आहे. तसेच डॉक्टरांच्या मनमानीमुळे रुग्णांना बाहेरून महागडी औषधे घ्यावी लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या केसपेपरवील अनेक औषधगोळ्या बाहेरून घेण्यासाठी सांगितले जाते.औषधालयात जवळपास सर्वच औषधगोळ्या उपलब्ध आहेत. काही औषधगोळ्यांचे विविध घटक उपलब्ध आहेत. गेल्या आठवड्यात सर्व डॉक्टरांची बैठक घेऊन उपलब्ध औषधगोळ्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाहेरची औषधे दिली जात असतील तर पुन्हा सूचना दिल्या जातील.'' वसंतबाबरे, शल्यचिकित्सक.

जिल्हा रुग्णालयात नेहमीच काही औषधगोळ्या बाहेरून घेण्यास सांगतात. उपलब्ध नसलेले औषध केसपेपरच्या व्यतिरिक्त चिठ्ठीवर लिहून देऊन बाहेरून घेण्यास सांगितले जाते. रुग्णालयात तपासणी करून सर्व औषधगोळ्या देण्याची गरज आहे. बाहेरील औषधावर विनाकारण खर्च होत आहे.'' अजयसोनवणे, रुग्ण.

पायाचे मांस वाढत आहे, याचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात आलो होतो. डॉक्टरांनी सुरुवातीला औषधगोळ्या घेण्यास सांगितले आहे. दिलेल्या औषधगोळ्यांपैकी खुणा करून उपलब्ध नसलेल्यावर गोल आळा करून बाहेरून घेण्यास सांगितले. बाहेरच्या औषधांचा खर्च कमी करण्याची गरज आहे.'' महेशवेदपाठक, रुग्ण.

बाहेरील औषधांचा भुर्दंड
सर्वसामान्यांचेरुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. रुग्णालयात तपासणी करून बाहेरच्या मेडिकलमधील औषधगोळ्या घ्याव्या लागत आहेत. अनेकवेळा डॉक्टरच बाहेरून औषध घेण्यास सांगतात. सर्वसामान्यांना बाहेरून औषध खरेदी करणे परवडत नाही. मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यामुळे काही रुग्णांना खरेदी करावी लागते. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी सर्व औषधगोळ्या उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

उपलब्ध अौषधे देण्याची गरज
जिल्हारुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी रुग्णालयात सर्व औषधगोळ्या असल्याचे सांगितले. तसेच उपलब्ध औषधगोळ्यांची लिस्ट दर आठवड्याला डॉक्टरांना दिली जाते. मात्र, बहुतांश डॉक्टर मनमानी करीत पर्यायी औषधगोळ्या देतात. डॉक्टरांनी दुसरी गोळी दिल्यामुळे फार्मासिस्ट पर्यायी उपलब्ध गोळी देत नाहीत. डॉक्टरांनी तपासणी करतानाच केसपेपरवर रुग्णालयातील उपलब्ध औषधगोळ्या देण्याची गरज आहे.