आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विजयालक्ष्मी’ची अात्महत्या नसून खून; पोलिस पतीवर खुनाचा गुन्हा, 6 मे पर्यंत कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एक मे रोजी कविता नगर येथे पोलिस पत्नी विजयालक्ष्मी (वय २१) हिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली होती. मात्र हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने खूनच असल्याचा गुन्हा जेलरोड पोलिसांत 2 मे रोजी दाखल झाला. या प्रकरणी पती शिवानंद बिराजदार यास अटक झाली असून 6 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

पती शिवानंद, सासरा भीमाशंकर बिराजदार, सासू लक्ष्मीबाई, नणंद कुसुम, दीर धरियप्पा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शिवानंद हा ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहे. विजयालक्ष्मीचे वडील श्रीशैल बिरादार (रा. करजगी, ता. जत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्यांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड करीत आहेत. 

बंगळे यास कोठडी 
दुसऱ्याघटनेत पोलिस मुख्यालय येथील घरी पेटवून घेऊन आत्महत्त्या केलेल्या चारुशीला बंगाळे हिचा पोलिस पती विनोद बंगाळे यास 5 मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
बातम्या आणखी आहेत...