आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: लैंगिक शाेषणाच्‍या संशयातून मुलगी, पित्याला काठीने फटके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - जात पंचायतींविराेधात राज्य सरकार अागामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कडक कायदा अाणण्याच्या तयारी असले तरी अजूनही राज्यातही या कुप्रथा संपुष्टात अालेल्या नाहीत याची प्रचिती नुकतीच सातारा जिल्ह्यात अाली. मुलीचे लैंगिक शाेषण केल्याच्या कथित अाराेपावरून गाेपाळ समाजातील जातपंचायतीने संशयित अाराेपी पिता व पीडित मुलीला चक्क चाबकाने फटके मारण्याची अमानुष शिक्षा केली. वाई तालुक्यातील पाचवड गावातील जातपंचायतीत घडलेला हा प्रकार नुकताच एका व्हिडिअाे फुटेजमुळे समाेर अाला अाहे. पाेलिसांनी या प्रकरणी जात पंचायतीच्या पंचांविराेधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी पाच जणांना अटकही करण्यात अाली अाहे. तर पीडित मुलीच्या वडिलांवरही लैंगिक शाेषणाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

तीन अाठवड्यापूर्वी ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत अाहे. अज्ञात व्यक्तीने याबाबतचे व्हिडिअाे फूटेज पुरवल्यानंतर ही अन्यायकारक घटना चव्हाट्यावर अाली. सातारा येथील एका स्वयंसेवी सामाजिक संस्थेने पाचवड येथील गोपाळ समाजाच्या जात पंचायतीने केलेल्या या अघाेरी कृत्याची ध्वनी चित्रफित भुर्इंज पोलिसांना सादर केली. त्यावरून पोलिसांनी संबंधित जातपंचायतीतील अाराेपींचा शाेध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गोपाळ समाजातील जातपंचातीचे पंच जिया दिनकर पवार, राजाराम, पवार, शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण अशी अाराेपींची नावे अाहेत. त्यांनी पीडित मुलगी व संशयित अाराेपी असलेल्या तिच्या वडिलांना काठीने फटके मारण्याची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठाेठावला हाेता. या अादेशानुसार जात पंचायतीच्या सदस्यांसमाेर संबंधित पिता- मुलीला जबर मारहाणही करण्यात अाली.
सर्वच स्तरातून निषेध
दरम्यान, पाच पंच व मुलीच्या वडिलांना पाेलिसांनी अटक केली असून त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात अाले अाहे. भुईंज पाेलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत अाहेत. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ.हमीद दाभाेलकर, मुक्ता दाभाेलकर व इतर सामाजिक संस्थांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला अाहे. सरकारने अशा स्वयंघाेषित पंचांविराेधात कारवाईसाठी कठाेर कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणीही दाभाेलकर यांनी केली अाहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचा फोटो व VIDEO..