आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून प्रेयसीच्या घरात मृतदेह पुरणाऱ्या डॉक्टरसह तीन महिलांना कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन विडी घरकुल येथील विनोदा संदूपटला हिच्या घरचे अंगण खोदून तीन दिवसांपूर्वी पुरलेला मृतदेह काढण्यात आला. - Divya Marathi
नवीन विडी घरकुल येथील विनोदा संदूपटला हिच्या घरचे अंगण खोदून तीन दिवसांपूर्वी पुरलेला मृतदेह काढण्यात आला.
सोलापूर-  प्रेयसीच्या प्रेमात अाकंठ बुडालेल्या नरहरी श्रीमल या “आरएमपी’ डाॅक्टरने पत्नी प्रवलिका श्रीमल यांचा गळा आवळून खून केला. यानंतर प्रेयसीसह इतर दोघींच्या मदतीने मृतदेह प्रेयसीच्या घरातच पुरला. ही घटना सोमवारी उघडकीस अाली. वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अक्कलकोट न्यायालयाचेे न्यायाधीश एस. एन. गवळी यांनी चौघांना २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

नरहरी रामदास श्रीमल (रा. लक्ष्मीनारायण टॉकीज सोलापूर), विनोदा नागनाथ संदुपटला, महादेवी बसवराज होनराव अंबूबाई भीमराव कणकी (रा. विडी घरकुल) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हा कसा घडला? इतर कोणाचा सहभाग आहे का? प्लास्टिक पीप कुठे आहे? वाहन कोणते, चालक कोण? वगैरे माहिती घेण्यासाठी सरकार पक्षाचे एस. डी. टोणपे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीतर्फे अॅड. एस . जी. वंगे यांनी काम पाहिले. 

आरोपीने मुलांचा विचारही केला नाही 
प्रवलिकायांना तीन लहान मुले आहेत. तरीही नरहरीने हे टोकाचे पाऊल उचलले. अापल्या मुलांचे पुढे काय होणार? याचाही विचार केला नाही. उलट १२ अाॅगस्ट रोजी त्याने पत्नी गायब असल्याची तक्रार दिली. पत्नीच्या भावांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. 
बातम्या आणखी आहेत...