आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारची कामे मार्चपासूनच सुरू करा : मुंढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जलयुक्तशिवार योजनेमध्ये जिल्ह्यातील २६५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये विविध विकासकामे मार्चपासूनच सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.

बहुउद्देशीय सभागृहात जलयुक्त शिवार मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या वेळी रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. बी. बिराजदार, वन विभागाचे सुभाष बडवे, लाभ क्षेत्र प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता चौगुले, भीमा पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता कांबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, २६५ गावांचा आराखडा बनवताना त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत. याची दक्षता घेण्यात यावी. तसेच विहीर पुनर्भरणाचे कामे ३१ मेपूर्वी संपवण्यात यावी. कोणाला दिला? याबाबतची अद्ययावत माहिती अधिकाऱ्यांनी ठेवावी, अशी सूचना केली. बैठकीसाठी प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, मनीषा कुंभार, प्रमोद गायकवाड, संजय तेली, दिवाकर धोटे, रवींद्र माने आदी उपस्थित होते.

संपूर्ण जिल्हा सिंचनाखाली ...
प्रधानमंत्रीकृषी सिंचन योजनेची पूर्तता होण्यासाठी सन २०१९ इतका कालावधी असला तरी सन २०१७ पर्यंत जिल्हा सिंचन आराखड्यानुसार जिल्ह्यातील १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. हा सिंचन आराखडा शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिले.