आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता बँक व्याख्यानमाला: समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी संत साहित्य - डॉ. रामचंद्र देखणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - परकीय आक्रमणामुळे महाराष्ट्रातला माणूस हा खचला होता. दुःखात बुडाला होता. स्वत:चे अस्तित्व विसरून गेला होता. अशा समाजाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्रात संत साहित्य उदयास आले, असे विचार पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी मांडले. मंगळवारी जनता बँक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले. संत सुधारक आणि महाराष्ट्र परंपरा हा व्याख्यानाचा विषय होता.

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते उद््घाटन झाले. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन किशोर देशपांडे होते. व्यासपीठावर बँकेचे संचालक महेश अंदेली, गजानन धरणे, अनिल बरगले, सतीश गंधे आदी उपस्थित होते. प्रेक्षिता चपळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘अलीकडच्या पिढीला संतांबद्दल विचारले असता त्यांना संत म्हणजे केवळ वारी किंवा जुनी माणसे वाटतात. पण तसे नाही. संतांच्या वाणीतून महाराष्ट्र घडला आहे. संतांची वाणी महाराष्ट्राच्या साहित्याची अभंगवाणी ठरली आहे. महाराष्ट्राच्या लोकजीवनातून ज्ञानोबा आणि तुकोबा यांना वगळले तर महाराष्ट्र शून्य होईल. संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचे श्वास, तुकोबा नि:श्वास तर समर्थ रामदास हे ध्यास आहेत,’ असे देखणे म्हणाले.

समाज ज्ञानसाक्षर होण्यासाठी संत साहित्य
श्री.देखणे म्हणाले, ‘संतांनी आपल्या विचारातून जीवनाला प्रवृत्तीवादातून निवृत्तीकडे कसे घेऊन जायचे याचा विचार मांडला. यात समाज ज्ञानसाक्षर होण्यासाठी संत साहित्याचा विचार झाला. समाज भावसाक्षर व्हावा म्हणून लोक परंपरा मांडली गेली. तसेच समाज हा बुद्धीसाक्षर व्हावा म्हणून सुधारकांनी प्रयत्न केले.
बातम्या आणखी आहेत...