आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दिवसांत रेल्वेचे २५० कोटींचे नुकसान, जाट आंदोलनाचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जाट आंदोलनाचा भडका वाढत असल्याने हरियाणातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या दररोज रद्द होत आहे. हरियाणातून दिल्लीकडे येणाऱ्या देशाच्या अन्य शहरांशी जोडणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठया गैरसोयीना तोंड दयावे लागत आहे. मागील सहा दिवसात जवळपास सातशे रेल्वे गाड्या रद्द झाल्या असून यामुळे रेल्वेला साधारणपणे अडीचशे कोटी रुपयाचे नुकसान झाले. जाट आंदोलन शमल्यानंतरच पर्वोत्तर रेल्वे रुळावरून धावण्याची शक्यता आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी जाटचे आंदोलन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम रोहतक, भटिंडा जाखल या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाडयांवर परिणाम झाला. यानंतर दिल्ली ते सोनपत ,पानीपत आणि अंबालाचा मार्गावरील रेल्वेसेवा थांबविण्यात आली. शुक्रवारी चंदिगडहून दिल्लीला जाणारी शताब्दी एक्स्प्रेस पाणीपत स्थानकावर पोहाेचल्यानंतर आंदोलकांनी रेल्वे अडवली. गाडीतील प्रवाशांच्या मागणीनुसार शताब्दीपुढे दिल्ली जाता पाणीपतवरून माघारी फिरली. त्यामुळे या मार्गावरील जवळपास ७२ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

^आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत सातशे रेल्वे गाडया रद्द झाल्याने प्रशासनास सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आंदोलन शमल्यानंतरच रेल्वे गाडया सुरळीत पणे धावतील. -िरज शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पूर्वाेत्तर रेल्वे,

२३ फेब्रवारीपर्यंत झेलम रद्द
आंदोलनामुळे पुणे -जम्मुतावी जम्मु तावी -पुणे झेलम एक्सप्रेस रदद करण्यात आले आहे. २३ फेब्रवारीपर्यत झेलम एक्सप्रेस धावणार नाही. कलका -शिर्डी एक्सप्रेस देखील २३ फेब्रवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. २२ फेब्रवारीला धावणारी यशवंतपूर -चंदिगड एक्स्प्रेस रद्द झाली आहे.