आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’तून येणाऱ्या उद्योगांचे लक्ष सोलापूरकडे वेधू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर हे महत्त्वाचे केंद्र आहे. मुंबई, पुणे, नाशिकनंतर सोलापूरची महापालिका स्थापन झाली. परंतु उद्योगांबाबत मागे पडले. ‘मेक इन इंडिया’ ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेतून गुंतवणूकदारांची यादी तयार आहे. त्यातील बड्या उद्योगांचे लक्ष सोलापूरकडे वेधू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली. एक मोठा उद्योग आला, की त्याला पुरवठा करणारे ४० ते ५० छोटे उद्योग सुरू होतात. रोजगार मिळतो, असेही ते म्हणाले.
चिंचोळी आैद्योगिक वसाहतीत बांधलेल्या ‘जयकुमार पाटील उद्योग भवन’चे उद््घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे मंचावर होते.

साेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे यांनी स्वागत करून वसाहतीतल्या अडचणी सांगितल्या. ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मुळे गुंतवणूक परत चालली, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होते, पोलिस खात्याला जागा देऊनही ठाणे होत नाही, अशा प्रमुख अडचणी त्यांनी मांडल्या. त्या प्रत्येकाचा परामर्श श्री. देसाई यांनी भाषणातून घेतला.
उर्वरितपान
देसाई म्हणाले, “पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी एमअायडीसींची. त्यासाठी निधीची तरतूद अाहे. परंतु ज्यांना जागा दिल्या ती मंडळी येतच नसतील तर त्यांना नोटिसा देऊन जागा परत घेण्याचा मार्ग अाहे. पोलिस खाते, एसटी महामंडळाला तसे कळवण्याच्या सूचना दिल्या. चिंचोळी एमआयडीसीच्या रस्त्यांसाठी साडेनऊ कोटी रुपयांची तरतूद झाली. निविदाही निघाल्या. परंतु ठेकेदार चालढकल करत असल्याचे दिसून अाले. त्याच्याकडून काम करून घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.” श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले तर किसन दाडगे यांनी आभार मानले.

चिंचोळी एमआयडीसीत बांधलेल्या जयकुमार पाटील उद्योग भवनचे उद््घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सोमवारी झाली. त्या वेळी (डावीकडून) महेश कोठे, शरदकृष्ण ठाकरे, सुभाष देशमुख, श्री. देसाई, गणेश सुत्रावे आदी.

सोलापूर बाहेर जाणारे टॅलेंट रोखा
^आयटी कंपन्या आणि मोठे उद्योग नसल्याने साेलापूरचा टॅलेंट बाहेर जात अाहेत. त्याला रोखण्यासाठी बड्या कंपन्यांना आकर्षित करणाऱ्या योजना दिल्या पाहिजेत. त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक आणली पाहिजे, याचा गांभीर्याने विचार करा.” अॅड.शरद बनसोडे, खासदार

‘एमआयडीसी’ करा
^कुंभारी परिसरात कामगारांच्या वसाहती वाढल्या. परंतु त्यांना रोजगार नाही. विडी अाणि यंत्रमाग उद्योगातच त्यांची उपजीविका चालते. याच परिसरात उद्योग अाले तर विडी कामगारांना पर्यायी रोजगार मिळू शकेल.” प्रणिती शिंदे, आमदार

मेक इन सोलापूर हवे
^सोलापुरात नावीन्यपूर्ण उत्पादने अाहेत. परंतु अडचणीही तितक्याच. उपलब्ध मनुष्यबळ आणि त्यांना प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. ‘मेक इन सोलापूर’ ही संकल्पना राबवल्यास बरेच उद्योग येऊ शकतील. त्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.” सुभाषदेशमुख, सहकारमंत्री
माणूस माळढोक, दोन्ही जगावेत

^आैद्योगिक वसाहतीत‘इको सेन्सिटिव्ह झोन’ लागू केल्यास उद्योग दिसणारच नाहीत. माणूस जगला पाहिजे आणि माळढोकही. त्यादृष्टीने केंद्रीय पर्यावरण खात्याशी चर्चा करू. केंद्राच्या अशा काही अटींतून सुटका करून घेतल्या आहेत. विमानतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. उद्योजकांनीही प्रवासाची तिकिटे घेतल्यास विमानसेवा सुरू होईल.” सुभाष देसाई, उद्योगमंत्री
बातम्या आणखी आहेत...