आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या क्रिकेटपटूंना कांगारूंकडून मिळणार धडे, ब्रेट ली सह दिग्गज येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियन आजी-माजी खेळाडू पैलू पाडणार आहेत. जामश्री क्रिकेट अकादमीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची फ्रँचायझी घेतली आहे. वेगाचा बादशाह, गोलंदाज ब्रेट ली या अकादमीचा ब्रँड अॅम्बेसेडर. ली सह अनेक आजी-माजी खेळाडू सोलापुरात येऊन उदयोन्मुखांना बारकावे शिकवणार आहेत.
मुंबईची स्पोर्ट््स एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड (सेदिल) ही संस्था, क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी जोडली गेली आहे. राजेश दमाणी यांच्या जामश्री क्रिकेट अकादमीने ‘सेदिल’च्या माध्यमातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी ऋणानुबंध जोडला. जामश्री आवारात टेनिस कोर्टच्या बाजूला अकादमीचे भूमिपूजन झाले. डिसेंबर २०१५ पासून अकादमी सुरू होईल.
मुंबईतील अकादमीत धडे देताना हसी.
गेले दोन तप ऑस्ट्रेलियाची क्रिकेटवर सत्ता आहे. ऑस्ट्रेलियनांचा मानसिक कणखरपणा वाखाणण्याजोगाच. अत्याधुनिक क्रिकेटमधील तंत्र आणि मंत्र सर्वप्रथम शिकावेेही त्यांनीच. म्हणूनच तिथे क्रिकेटपटूंच्या पिढ्या घडतात. बालपणीच हिऱ्यांना पैलू पडतात.
खेळाडूंना फायदा काय?
नामवंतऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मार्गदर्शनात सराव. क्रिकेटचे बारकावे शिकता येतील. निवडकांना दरवर्षी एकदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी. नवतंत्रज्ञानाचा अवलंब. मानसिक तसेच शारीरिक तंदुरुस्ती, क्रिकेटचातुर्य, इच्छाशक्ती आणि सांघिक भावना वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट.
८-१४ वयाच्या खेळाडूंना प्रवेश
^सोलापूरचेअनेक क्रिकेटपटू राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर डंका पिटत आहेत. ते १४ वयोगटातील खेळाडूंना प्रवेश. नामवंत खेळाडू घडवणे हा हेतू. राजीवदेसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जामश्री
ऑस्ट्रेलियाच कशासाठी?
प्रशिक्षणाचे स्वरूप काय?
ऑस्ट्रेलियातीलआजी-माजी क्रिकेटपटूंची दरवर्षी शिबिरे. अकादमीतील प्रशिक्षकांसाठीही वर्षातून एक शिबिर. अशा प्रशिक्षकांना ऑस्ट्रेलियन अकादमी प्रमाणपत्र देणार. महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना टर्फ प्रशिक्षण म्हणजे मॅटविना सराव. बहुतांश ठिकाणी मॅटवरच सराव असतो. जामश्री त्याला अपवाद. अकादमीत खेळपट्ट्या असतील. पैकी एक मुख्य (मोठी) असेल.
टर्फ प्रशिक्षण निकडीचे का?
मॅटवरचेक्रिकेट सामने आता इतिहासजमा होत आहेत. मग असे असूनही या पारंपरिक सरावाशी का चिकटून बसायचे? बालवयातच टर्फ प्रशिक्षण भविष्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू निर्माण करील, असे राजीव देसाई यांना वाटते.
संकल्पना काय?
सोलापुरातहीआंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी असावी असे राजेश दमाणी आणि जामश्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव देसाई यांना वाटायचे. त्यातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी नाते जुळले. देशात फक्त मुंबई आणि राजस्थानातच अशी क्रिकेट अकादमी सुरू आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर सोलापुरात दुसरीच अकादमी.