आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेत कन्हय्याला ‘रेड आर्मी’चे कडे असणार, विद्यार्थी, युवकांत उत्कंठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते कन्हय्या कुमार मंगळवारी सोलापूरला येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी डाव्या अाघाडीने मोठी तयारी केली. त्यांच्या सभेसाठी शांती चौकातील पुंजाल क्रीडा मैदानावर २० बाय ३० आकारात भव्य मंच उभारला. त्यांच्या समोर ४५ फूट लांबीचा डी-झोन केला. जिथे सामान्यांना प्रवेश नाही. विशेष म्हणजे लालरंगाच्या वस्त्रांतील माकपचे कार्यकर्ते ‘रेड आर्मी’ बनून कन्हय्यांभोवती सुरक्षा कडे उभे करणार आहेत. एकूण कन्हय्याच्या सभेची सोलापूरच्या युवक विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्कंठा लागून राहिली. 
 
माकप, भाकप, शेकाप, डीवायएफआय, एसएफआय या पक्ष आणि संघटनांनी ही सभा आयोजित केली आहे. त्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून तयारी सुरू झाली. पोलिस आणि महापालिकेने परवाने दिल्यामुळे ही सभा होईल. एवढे होऊनही त्यात कुठला गोंधळ होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी ५०० कार्यकर्ते रेड आर्मीमध्ये सहभागी होत आहेत. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या अाडम, भाकपचे ज्येष्ठ नेते प्रा. तानाजी ठोंबरे, अॅड. एम. एच. शेख आदी मंचावर असणार आहेत. 
 
दुपारी आगमन 
लातूर येथील सभा आटोपून कन्हय्या दुपारी दीडला सोलापूरला येतील. दुपारी चारला शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप होईल. सायंकाळी सहाला पुंजाल क्रीडा मैदानावर सभा होईल. त्यानंतर "सिद्धेश्वर'ने मुंबईकडे रवाना असा एकूण कार्यक्रम आहे. 
बातम्या आणखी आहेत...