आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्यादान योजनेची रक्कम झाली दुप्पट, प्रती जोडपी २० हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य सरकारने सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांच्या ‘कन्यादान’ रकमेत दुप्पट वाढ केली आहे. पूर्वी १० हजार रुपये मिळत होते आणि २० हजार रुपये मिळणार आहेत. सामूहिक विवाह सोहळ्याचे अायोजन करणाऱ्या सेवभावी संस्थांना देण्यात येणारे अनुदानही दुप्पट झाले आहे. त्यांना प्रती जोडपी हजार रुपये मिळतील. अनुसूचित जाती, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या कुटुंबातील जोडप्यांना त्याचा लाभ मिळेल.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा निर्णय जाहीर केला. आर्थिक दुर्बल आणि कामगार क्षेत्रातील मागास घटक सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हावेत, हा त्यामागचा मुख्य हेतू अाहे. सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी २००३ मध्ये ‘कन्यादान’ ही योजना सुरू केली. त्यात वधूच्या मणिमंगळसूत्रासाठी हजार आणि अाणि संसारोपयोगी साहित्यासाठी हजार असे एकूण १० हजार रुपये मिळत होते. विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या सेवाभावी संस्थांना प्रती जोडपी हजार रुपयांचे अनुदान मिळायचे. १२ वर्षांपूर्वीच्या या योजनेचा आढावा घेतला असता, ही रक्कम फारच कमी असल्याची बाब पुढे आली. सोने अाणि वस्तूंच्या दरात झालेली वाढ वाहता, त्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाला सूचनाही दिल्याचे खात्याचे उपसचिव एन. एल. सूळ यांनी म्हटले अाहे.

सोलापुरात सामुदायिक विवाह सोहळे अधिक
सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या आढाव्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वाधिक सामूहिक विवाह सोहळा झाल्याचे दिसून अाले आहे. लोकमंगल प्रतिष्ठान, माढ्याची विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, अरणच्या संत सावता माळी देवस्थानने यात मोठी भूमिका बजावली. शिवाय, समाज स्तरावरही असे सोहळे वाढले. छोट्या-मोठ्या सेवाभावी संस्था अाणि सामाजिक संघटनाही सामूहिक विवाह सोहळ्यांवर खर्च करत असल्याचे दिसून आले. ग्रामीण आणि शहरी भागातील वंचित घटकांसह अंध आणि अपंगही यात सहभागी होत आहेत.

खूप मोठा आधार मिळेल
^वंचित घटकांसाठी२० हजार रुपये खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी मोठा आधार अाहे. या रकमेतून ते छोटा व्यवसायही करू शकतात. या निर्णयाने सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राेत्साहन मिळेल. नव्याने येणाऱ्या संस्थांची संख्याही वाढेल. चळवळीला यामुळे बळ मिळेल.”
ब्रीजमोहनफोफलिया, सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते
बातम्या आणखी आहेत...