आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्याकुमारी गाडीच्या इंजिनला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कन्याकुमारीहून मुंबईला निघालेल्या जयंतीजनता एक्स्प्रेसच्या इंजिनमधील कंप्रेसर पेटल्याने इंजिनला आग लागली. रेल्वे चालकांनी तत्परता दाखवत अग्निशामक यंत्राच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.


मुंबईकडे निघालेली गाडी अक्कलकोटजवळील जेऊर येथे येताच इंजिनमध्ये एअरब्रेकला दबाव निर्माण करण्यासाठी असलेल्या कंप्रेसरने पेट घेतला. गाडीतील चालकाने ताबडतोब गाडीचे इंजिन बंद केले. चालक आणि गार्डने चार अग्निशामक यंत्रणेच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी जवळच्या शेतात धाव घेतली. यादरम्यान पळताना एक महिला जखमी झाली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अक्कलकोट येथून अग्निशामक दलाचे बंब पाठवण्यात आले. दुसरे इंजिन लावल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. यामुळे गाडीला दोन ते अडीच तासाचा विलंब झाला.

बातम्या आणखी आहेत...