आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करबला: संयम, अहिंसा, सत्य आणि लाेकशाहीचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकमधील करबलाच्या मैदानात प्रेषित मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्यासह ७२ जण शहीद झाले होते. या युद्धात संयम, अहिंसा आणि सत्याचे दर्शन घडले आणि समाजात परिवर्तन घडले. सत्यासाठी प्राण गेले तरी चालेल, अशी भूमिका घेऊन हजरत इमाम हुसैन यांनी इस्लामच्या माध्यमातून प्रेषित मुहम्मद यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले.
इस्लामने लोकशाहीची परंपरा जपली
इस्लामधर्मामध्ये खलिफा निवडीची प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने होत होती. मात्र इस्लाम धर्माचे खलिफा हजरत मुआविया हे गंभीर आजारी पडल्यानंतर त्यांनी खलिफा पदाची सूत्रे स्वत:चा मुलगा यजिदला सोपविले. हजरत मुआविया यांची वृत्ती जरी चांगली असली तरी हा त्यांचा निर्णय मात्र चुकीचा ठरला. यावेळी त्यांनी लोकशाहीला फाटा देऊन स्वत:च्या मुलाची निवड केली होती. या निवडीकरिता लोकशाही पध्दतीने एक कमिटी नियुक्त केली जायची. त्या कमिटीमध्ये चर्चा विनिमय झाल्यानंतर इस्लामी सूत्रानुसार खलिफा निवडला जायचा. मात्र असे करता यजिदला थेट खलिफाची सूत्रे प्रदान करण्यात आली होती. त्यामुळे कुफा शहरात वादळ माजले. यजिद हा चांगल्या विचाराचा आणि चांगल्या वृत्तीचा नसल्यामुळे अनेकांनी विरोध दर्शविला. मात्र त्याच्या धास्तीमुळे तो विरोध जास्त वेळ टिकू शकला नाही. तरीही अनेक मुस्लिम समाजबांधवांना यजिद खलिफा झाल्याचे रूचले नाही. त्यामुळे त्यांनी पैगंबर मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांना पत्रव्यवहार करून आपली खंत दाखवून दिली. त्यावेळी हजरत इमाम हुसैन यांनी खुफा रहिवाशांना मदत करण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांचे अनुयायी मदिना रहिवासी यांनी हजरत इमाम हुसेन यांना कुफावाले धोकेबाज आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, मदत करू नका असे सांगितले. परंतु त्यांना माणुसकी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर कुफा शहरवासीयांची मदत करण्याचे ठरविले आणि लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.

अहिंसेलाचप्रथम प्राधान्य
जेव्हाहजरत इमाम हुसेन यांनी खुफा शहरवासीयांना मदत करायचे ठरवले. तेव्हा त्यांनी प्रथम त्यांचे भाऊ मुस्लिम बिन अकील यांना कुफा शहराची पाहणी करण्यासाठी पाठविले. त्यावेळी मुस्लिम बिन अकिल यांच्यासोबत त्यांची दोन मुले होती. ही गोष्ट यजिदला कळाल्यानंतर त्याने एक कठोर गव्हर्नरला कुफाच्या नागरिकांना भीती दाखविण्यासाठी पाठविले. तो आला. त्याने कुफाच्या नागरिकांनाभीती दाखविली. या प्रकाराला कुफाचे नागरिक बळी पडले आणि त्यांनी पुन्हा धोका दिला. मुस्लिम बिन अकील यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना मारून टाकण्यात आले. याबद्दल हजरत इमाम हुसैन यांना काहीच माहिती नव्हती. ते कुफा शहरवासीयांच्या मदतीला मदिना येथून रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि अनुयायी होते. यजिदला हे समजताच त्याने लष्कराची एक तुकडी पाठविली. लष्कराने हजरत इमाम हुसैन यांना रस्त्यात अडवले आणि सर्वांना करबला या परिसरात नेले. त्यावेळी हजरत इमाम हुसैन यांनी लष्कराला सांगितले, 'मी सत्तेसाठी किंवा युद्धासाठी आलो नाही, कुफा येथील नागरिकांची फिर्याद ऐकवण्यासाठी आलोय. याबाबत मला एकतर यजिदला भेटायला द्या किंवा मला मदिनेला परत जायला द्या किंवा इस्लामच्या प्रचारासाठी जाऊ द्या.' परंतु लष्कराने एकही ऐकले नाही. यावरून हजरत इमाम हुसैन यांच्या संयम आणि अहिंसा प्रेमीचे दर्शन घडते.

शहीद झाल्यानंतर समाजात परिवर्तन
यजिदच्यालष्कराचा प्रमुख हुर याला जेव्हा यजिदचा उद्देश समजला तेव्हा त्याने यजिदचे लष्कर सोडून हजरत इमाम हुसैन यांच्याकडे आला. अखेर मोहरमच्या महिन्यात युद्धास सुरुवात झाली. या युध्दात हजरत इमाम कासिम, हजरत अली अकबर हे प्रथम शहीद झाले. हजरत कासिम हे सुद्धा शहीद होते. यावेळी हजरत अली अजगर हा चिमुकला बाळ हजरत इमाम हुसैन यांच्या कुशीत होता. तेव्हा यजिदच्या सैन्याने बाणाने त्या बाळाला ठार केले. उपस्थितांची तहान सहन झाल्यामुळे हजरत अब्बास हे पाणी घेण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना निर्दयीपणे मारण्यात आले. हजरत इमाम हुसैन यांच्यासोबत मूठभर लोक आणि यजिदच्या लष्करात हजारो सैन्य होते. तरी सुध्दा हजरत इमाम हुसैन यांच्या समोर येऊन त्यांना मारण्याची धमक कोणामध्ये नव्हती. त्यासाठी लष्कराने लांबूनच बाणांचा मारा केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले. त्यात हजरत इमाम हुसैन सुद्धा जखमी झाले. तरी त्यांनी जखमी अवस्थेत नमाजच्या वेळी नमाज पठण केले. नमाज अदा करण्याची संधी साधून लष्कराने मागून त्यांच्यावर वार करून त्यांचा शिरच्छेद केला. यानंतर जे जे शहीद झाले त्यांच्यावर लष्कराने घोडे पळविले. शिरच्छेद केल्यानंतर ते मुंडके भाल्यावर अडकवून यजिदसमोर हजर झाले.

या युध्दात ७२ जण शहीद झाले आणि उर्वरीत महिलांना कैदी बनवून यजिदसमोर आणण्यात आले. या युध्दात हजरत इमाम हुसैन यांच्यासह ७२ जण शहीद झाले तरी विजय सत्याचाच झाला. या युध्दानंतर मदिना अाणि मक्केमध्ये एक प्रकारचा समाज परिवर्तन झाला. सर्वांमध्ये संघर्ष करण्याची जिद्द निर्माण झाली, क्रांती झाली आणि इस्लामला अपेक्षित असलेला परिणाम दिसून आला.

सत्यासाठी दिला प्राण
हजरत इमाम हुसैन यांनी मी युद्धासाठी अालो नाही, असे सांगितले. परंतु त्यांचे एकही ऐकण्यात आले नाही. उलट त्यांना उद्धट उत्तर दिले, alt147एक तर तुम्ही यजिदला खलिफा म्हणून स्वीकारा अन्यथा मृत्यूला सामोरे जा,'' असे म्हणताच हजरत इमाम हुसैन यांनी alt147मी मृत्यूला सामोरे जाईन. परंतु अत्याचार, असत्यासमोर वाकणार नाही,'' असे उत्तर दिले. त्यावेळी लष्करप्रमुखाने युद्धाची घोषणा केली. लष्कराने कुटनीतीने पाण्याच्या तलावावर सैन्य तैनात केले. त्यामुळे पाण्यासाठी हाल होत होते. हजरत इमाम हुसैन हे युद्धासाठी आले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे शस्त्रे नव्हती आणि सैन्यही नव्हते, कुटुंबीय सदस्य होते. तीन दिवसांनंतर पाण्यासाठी खूप हाल हाल होत होते. त्यामुळे हजरत इमाम हुसैन यांनी आपल्या सोबतींना एकत्र बोलावले आणि त्यांना मदिना परत जाण्यास सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना आम्ही मृत्यूला सामोरे जाऊ परंतु तुमची साथ सोडणार नाही, असे उत्तर दिले. पाहता पाहता युद्धात सर्व ७२ जण शहीद झाले. सत्यासाठी मरणालाही आनंदाने स्वीकारणारे उदाहरण समोर येते.
इराकमधील करबलाच्या मैदानात प्रेषित मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्यासह ७२ जण शहीद झाले होते. या युद्धात संयम, अहिंसा आणि सत्याचे दर्शन घडले आणि समाजात परिवर्तन घडले. सत्यासाठी प्राण गेले तरी चालेल, अशी भूमिका घेऊन हजरत इमाम हुसैन यांनी इस्लामच्या माध्यमातून प्रेषित मुहम्मद यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले.
बातम्या आणखी आहेत...