आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटींची थकबाकी, कारीगर पंप केला सील, तहसीलदार शेंडगे यांनी केली कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शासनाची ७ कोटी ३३ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी मंगळवारी सात रस्ता परिसरातील कारीगर पेट्रोल पंपास सील ठोकण्यात आले. थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्याला कोणतेही उत्तर दिल्याने तहसीलदार समाधान शेंडगे यांनी कारवाई केली.

१९६० पासून कारीगर पेट्रोल पंपाची आकारणी भोगवटा मूल्य थकले होते. त्याची मोजणी केली असता कोटी ३३ लाख ६९ हजार रुपये कारीगर यांना भरायचे हाेते. याप्रकरणी त्यांना एप्रिल रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी उत्तर दिल्याने तहसीलदार शेंडगे, सोलापूर मंडलाधिकारी अनिल शहापुरे यांनी कारीगर पंप सील केले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशामध्ये ही जागा शहराच्या मध्यवस्तीत असल्याने जागा ताब्यात घेतल्यानंतर त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, याची दक्षता घ्यावी.

शिवाय जागा शासनजमा केल्यानंतर त्याबाबतचा पंचनामा, कब्जेपावती दुरुस्त मिळकतपत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

पेट्रोलपंप सील करणे गैरलागू
इंडियनपेट्रोलियमकंपनीची डीलरशीप अामच्याकडे अाहे. पेट्रोलपंपाच्या जागेचे भाडे भरण्याची जबाबदारी इंडियन पेट्रोलियम कंपनीकडे अाहे. प्रशासनाने कंपनीचे बँक खाते सील करायला हवे होते. पेट्रोलपंप गैरलागू सील करून ग्राहकांचीच अडचण झाली अाहे. सध्या उत्तर, दक्षिण, उत्तर तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या टँकरला अाम्ही इंधन पुरवतो. त्यावर परिणाम झाला अाहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याचाही या कृतीमुळे भंग होऊ शकतो. पंप बंद केल्याने अाम्हीच काही केले काय? असा समज लोकांचा होईल. अाफताब कारीगर