आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्कटकमध्ये संशोधन, पेटंट मिळवण्याचा प्रयत्न; साेलापूरचा युवक राहुल गायकवाडची धडपड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गायकवाड - Divya Marathi
राहुल गायकवाड
सोलापूर- कंपासमध्ये वापरण्यात येणाऱ्या कर्कटकमध्ये मेजरमेंटची सोय, इझी मल्टिपल युजर स्क्रू ड्रायव्हर यात नव्या कल्पना आणून त्याचे पेटंट मिळवण्यासाठी राहुल गायकवाड धडपडत आहे. या संशाेधनाचे पेटंट मिळण्याच्या अंतिम टप्प्यातही आहे. असे साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांना जर असे बदल आपल्या उत्पादनात करायचे असेल तर  याचे स्वामित्व राहुलने राखून ठेवले आहेत. संशोधन  केवळ थिसिससाठी न करता प्रत्यक्ष उपयुक्ततेवर, संकल्पनेवर अभ्यास करणारा हा वेगळ्या वाटेवरचा शिलेदार.     

‘युवकांनी प्रचलित शिक्षण तर घेतलेच पाहिजे, त्याचबरोबरच चौकस राहून आवडीच्या विषयात संशोधनही  केले पाहिजे. नवे बदल घडवण्यासाठी हे आवश्यक आहे. उगीच उच्च शिक्षण घेऊन छोटी-मोठी नोकरी मिळवण्यात आयुष्य पणाला लागत आहे’, असे राहुलचे मत अाहे. ताे सध्या बीसीएस शिकतोय, तेही एक्स्टर्नल.  

वेळ वाचणार, अचूकता येणार   
कर्कटकच्या दोन्ही टोकांचा वापर करून कोणत्याही रेषेची मायक्रो मिलीमध्ये मोजणी करता येते. मात्र, सध्या ही मोजणी करताना आधी रेषेच्या दोन्ही टोकांपर्यंत कर्कटक ताणले जाते. नंतर ती दोन्ही टाेके पट्टीवर ठेवून अंतर मोजले जाते. असे करण्यात वेळ जातो, मोजताना चूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्या कर्कटकमध्येच मेजरपट्टी बसवण्याची कल्पना राहुलने मांडली. त्या संशोधनाचा शास्त्रीय अहवाल तयार केला व पेटंट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला.    
 
स्वप्न साकार करण्याचा आनंद घ्या  
राहुल सध्या ‘फिक्शन’ या विषयावर इंग्रजीतून कादंबरीही लिहीत आहे. ‘युवकांनी प्रचलित शिक्षण तर घेतले पाहिजेच. त्याचबरोबर उद्योजकतेचे गुणही जोपासले पाहिजेत. नवीन  उद्योग, नव्या कल्पना यावर सतत कार्यमग्न राहिले पाहिजे. वेळ वाया न घालवता संशोधन, शिक्षण, करिअर, उद्योग यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. स्वप्न बघत जगण्यापेक्षा स्वप्ने साकारण्याचा आनंद घेतला पाहिजे,’ असे ताे सांगताे. 
बातम्या आणखी आहेत...