आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात बस-व्हॅनची धडक सोलापूरच्या 6 जणांचा जागीच मृत्यू; 2 जणांची प्रकृती चिंताजनक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुरातील 6 जणांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले. - Divya Marathi
सोलापुरातील 6 जणांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले.
सोलापूर- कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बेळगी तालुक्यात कर्नाटक राज्य परिवहनची बस आणि एका क्रूझर व्हॅनची धडक होऊन सकाळी झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील दारफळ सिना व उपळाई खुर्द येथील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
अपघातग्रस्त क्रुझर व्हॅन (एमएच 45 एन 4327) कारवारहून सोलापूरकडे येत होती. तर, बस विजयपुरा येथून बागलकोटकडे निघाली होती. विजापूर-हुबळी रोडवर कोर्सी गावाजवळ या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की बसच्या धडकेत व्हॅनच्या अर्ध्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. व्हॅनमध्ये 12 प्रवासी होते. त्यातील 6 जागीच ठार झाले. तर, दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पांडुरंग हनुमंत  साळुंके (२४), विजया अनंता शिंदे (६०), रजनी हनुमंत शिंदे (६१, तिघे रा. दारफळ), चालक नागेश लक्ष्मण माळी (२८, रा. उपळाई खुर्द), सुग्रीव कारंडे (एकुरके, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एकाची अाेळख पटू शकली नाही. मृतांपैकी रजनी शिंदे व विजया शिंदे या दोन्ही सख्ख्या बहिणी आहेत. अपघात इतर भीषण हाेता की क्रूझर गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. 
 
बसमधील काही प्रवासी जखमी
बसमधील काही प्रवासीही अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नागेश, विजया शिंदे व पांडुरंग साळुंखे यांचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. व्हॅनमधील प्रवासी कॅन्सरवरील उपचारासाठी कारवारला गेले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...