सोलापूर - रिद्धी- सिद्धी फायनान्स कंपनीत नागरिकांना पैसे गुंतवण्याचे अामिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील नागेश काटगावकर (वय ३५, रा. तुळजापूरवेस) यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. जाधव यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला अाहे.
पाच अाॅक्टोबर रोजी पुन्हा जामिनावर सुनावणी होणार अाहे. तीस सप्टेंबर ते तीन अाॅक्टोबरपर्यंत दररोज तपास अधिकारी यांच्याकडे हजेरी लावण्याची अट घालण्यात अाली अाहे. गुन्हा दाखल झाल्यापासून नागेश काटगावकर हे गायबच होते. सरकारतर्फे स्वप्नील पेडणेकर, फिर्यादीतर्फे प्रियल सारडा, रितेश थोबडे, सचिन इंगळगी, अारोपीतर्फे अशोक मुंदर्गी या वकिलांनी काम पाहिले.