आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep In Mind If The Connection Broke,five Thousand Councilor

कनेक्शन तोडाल तर याद राखा, नगरसेवकांना दिलेत पाच हजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- शहरातील बेकायदा नळ शोधमोहिमेला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. अनेक ठिकाणी बोगस नळजोडणी देण्यात काही नगरसेवक सहभागी असल्याची धक्कादायक बाब मोहिमेदरम्यान समोर आली. "बोगस नळ शोधमोहीम सुरू करू नका', असे काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना फोन करून सांगण्यामागचे रहस्यही उलगडले.
"नळ कनेक्शन तोडाल तर यादा राखा, आम्ही यासाठी नगरसेवकांना पाच-पाच हजार रुपये दिले आहेत', असे सांगत महिला महापालिकेच्या पथकावर धावून जाण्याचे प्रकारही घडले. अपुऱ्या पोलिस यंत्रणेमुळे मोहीम आवरती घेण्याची नामुष्की दोन ठिकाणी आली.
झोन क्रमांक मधील साखर पेठेत चाेरून पाणी वापरणाऱ्या दोन बोगस नळधारकांवर पथकाने कारवाई केली. साखर पेठेत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मोहीम राबवण्यात आली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसभर ५३० घरांची तपासणी केली. काही घरे बंद असल्यामुळे नळ कनेक्शन आहे की नाही याविषयी काही अंदाज बांधता आला नाही. नळ कनेक्शन असलेल्या ठिकाणी भाडेकरू राहत असल्यामुळे पाणीपट्टीची पावती भाडेकरू रहिवाशांकडे नाही. त्यामुळे मूळ घरमालक येईपर्यंत मनपाच्या पथकाला त्यांची वाट बघत थांबावे लागत होते.
हद्दवाढ भागातील झोन क्रमांक पाचमध्ये अनधिकृत नळजोड मोहिमेत तीन पथके होती. प्रभाग क्रमांक ४७, ४८ ४९ मध्ये झालेल्या तपासणीत तीन जणांकडे अनधिकृत नळ मिळून आले. माशाळवस्ती, सिरत नगर, सीमला नगर, सोरेगाव, नंदी नगर, यामिनी नगर, पाटील नगर, पापाराम नगर या भागात मोहीम घेण्यात आली. संशयीत घरांची तपासणी करण्यात आली. दिवसभर ७४३ घरांची तपासणी करण्यात आली. झोन अधिकारी नीलकंठ मठपती, उपअभियंता अवताडेंसह तिघांचे पथक नेमून ही मोहीम घेतली. नागरिकांनी पावत्या दाखवल्या, सोरेगाव वगळता अन्य भागात सुरळीत मोहीम झाली.
सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास झोन क्रमांक अंतर्गत प्रभाग क्रमांक मधील जोशी गल्लीत मोहिमेला सुरुवात झाली. "एवढी मोठी गल्ली, पण सार्वजनिक नळ नाहीत. आम्ही चोरी केली नाही. नगरसेविकेस पाच हजार रुपये देऊन नळ कनेक्शन घेतले आहे. जाऊन त्यांना विचारा. आमचे नळ कनेक्शन तोडाल तर याद राखा', असे म्हणत जोशी गल्लीतील महिला पथकावर धावून गेल्या. पोलिस यंत्रणा अपुरी होती. परिस्थिती चिघळण्याचा अंदाज आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा बाजूच्या वडार गल्लीत वळवला.

जोशी गल्ली आणि वडार गल्लीत सुमारे ८५ टक्के बेकायदा नळ कनेक्शन असल्याचा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पथकाने वडार गल्लीतील पाच नळ कनेक्शन तोडले. तेथेही लोकांनी गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांची गाडी आली आणि गोंधळ थांबला.
वडार गल्लीतील एका महिलेने सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे यांचा हात धरून घाणीतून नेत शौचालयाची दुरवस्था दाखवून दिली. बोगस नळ तोडणाऱ्या महापालिकेचे या घाणीकडे दुर्लक्ष का, असा जाब विचारला. गोंधळ वाढत गेला. रस्त्यावर गर्दी वाढली. गर्दीच्या अफवा कन्ना चौकापर्यंत पोहाेचल्या. या कारवाईत नगरसचिव ए. ए. पठाण, झोन अधिकारी अरुण भालेराव आदींचे पथक होते.
होटगी रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर नगर, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजवळील शंकरनगर, आेम नम: शिवायनगर येथे झालेल्या तपासणीत नळजोड बोगस आढळून आले. हे सर्व नळजोड तोडून संबंधितांचा जबाब घेण्यात आला. त्यांच्यावर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती, झोन चे अधिकारी विशाल सातपुते यांनी दिली.

झोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत घेऊन तपासणी मोहीम सुरू केली. संशयित ठिकाणी नळजोडधारकांच्या पावत्या तपासण्यात आल्या. ज्यांनी पावत्या दाखवण्यास टाळाटाळ केली, अशा ठिकाणी अधिक चौकशी करण्यात आली. त्यातून बोगस नळांचा शोध लागला. काही ठिकाणी संघर्षही झाला. परंतु पोलिसांची कुमक असल्याने मोठी मदत झाली.
महानगरपालिकेच्या झोन एकमधील १८ अनधिकृत नळ तोडण्यात आले. चंडक बगिचा, नीला नगर, गौरा नगर, नागणे देशमुख अपार्टमेंट, बुधवार पेठ आदी परिसरात पथक फिरले. जागेवर पंचनामा करत अवैध नळजोड तोडण्यात आले. चंडक बगिचा येथे एकूण सहा बोगस नळ सापडले. विभागीय अधिकारी श्री. आलमेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास झोन क्रमांक अंतर्गत प्रभाग क्रमांक मधील जोशी गल्लीत मोहिमेला सुरुवात झाली. "एवढी मोठी गल्ली, पण सार्वजनिक नळ नाहीत. आम्ही चोरी केली नाही. नगरसेविकेस पाच हजार रुपये देऊन नळ कनेक्शन घेतले आहे. जाऊन त्यांना विचारा. आमचे नळ कनेक्शन तोडाल तर याद राखा', असे म्हणत जोशी गल्लीतील महिला पथकावर धावून गेल्या. पोलिस यंत्रणा अपुरी होती. परिस्थिती चिघळण्याचा अंदाज आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा बाजूच्या वडार गल्लीत वळवला.

जोशी गल्ली आणि वडार गल्लीत सुमारे ८५ टक्के बेकायदा नळ कनेक्शन असल्याचा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पथकाने वडार गल्लीतील पाच नळ कनेक्शन तोडले. तेथेही लोकांनी गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांची गाडी आली आणि गोंधळ थांबला.
वडार गल्लीतील एका महिलेने सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे यांचा हात धरून घाणीतून नेत शौचालयाची दुरवस्था दाखवून दिली. बोगस नळ तोडणाऱ्या महापालिकेचे या घाणीकडे दुर्लक्ष का, असा जाब विचारला. गोंधळ वाढत गेला. रस्त्यावर गर्दी वाढली. गर्दीच्या अफवा कन्ना चौकापर्यंत पोहाेचल्या. या कारवाईत नगरसचिव ए. ए. पठाण, झोन अधिकारी अरुण भालेराव आदींचे पथक होते.

जोशी गल्लीत मोहीम घेणारच : आयुक्त
येथील प्रभागात तपासणी
०३ ०४
०७ ०८
१० १४
१५ २६
३२ ३३
४७ ४८
४९ ५१
झोन
झोन
झोन
झोन
झोन
झोन
झोन
गुन्हे
झोननिहाय तपासणी
झोन
जोशी गल्लीत कारवाई करताना अनेक महिला पािलकेच्या पथकावर धावून आल्या. विरोध झाल्याने जोशी गल्लीतील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तेथे हस्तक्षेप झाला असला तरी यापुढील काळात पोलिस बंदोबस्त घेऊन कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत नळ शोधणार असल्याचे आयुक्त काळम-पाटील यांनी सांगितले. छाया : िदव्य मराठी
३१२
१५९
९९४
७४३
३७०
५०३
११४
२५७
१२
१५
०८
२१
०६
०३
०२
१८
विजापूर रोड येथील माशाळ वस्ती येथे बोगस नळ शोध मोहीम.
झाेन क्रमांक
तीन बोगस नळ
झाेन क्रमांक
दोन बोगस नळ
प्रत्येक घरासमोर "सरकारी नळ'
जोशीगल्लीत जास्त काही कारवाई करता अाली नाही. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा शेळगी गावठाण भागातील अवसेकर वस्तीकडे वळवला. वस्तीत प्रत्येक घरासमोर नळ आहे. हे नळ सरकारी असल्याची माहिती तेथील लोकांनी दिली. अधिकाऱ्यांनी तपासणी करून तेथील १४ नळ कनेक्शन तोडले.
होताएकच कर्मचारी
तयारीपाहण्यासाठी आयुक्त काळम पाटील यांनी झोन क्रमांक ला सकाळी ७.५५ ला भेट दिली. तेव्हा फक्त एक कर्मचारी उपस्थित होता. "आता प्रेमाएेवजी दुसरी भाषा वापरावी लागेल', असे आयुक्त म्हणाले.
झाेन क्रमांक
२१ बोगस नळ
बोगस नळ असे
०४: रेवणसिद्धेश्वर नगर
०३ : शंकर नगर
०२ : आेम नम:शिवायनगर
झाेन क्रमांक
आठ बोगस नळ

सात मजली इमारतीमध्ये ४० फ्लॅटस्, दोनच नळ
चंडकबगिचा परिसरातील कमलश्री अपार्टमेंट ही सात मजली इमारत आहे. या इमारतीत किमान ४० फ्लॅटस आहेत. या इमारतीसाठी केवळ दोन अर्धा इंची नळजोड आढळले. त्याच्याही नोंदी मिळाल्याने अधिकारी एस. ए. आलमेलकर यांनी जोडण्या तोडण्याचे आदेश दिले. याच इमारतीत वरच्या मजल्यावर किशोर चंडक यांचे निवासस्थान आहे.

झाेन क्रमांक
१८ बोगस नळ